जाणून घ्या ब्राम्हीचे लाभदायी फायदे | benefits of ayurvedic Brambhi

ब्राम्ही

आयुर्वेदिक औषधी ही हजारो वर्षापासून निरनिराळ्या आजारांमध्ये वापरली जातेय , अनेक प्रकारच्या गंभीर आजारांमध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधाचं खूप मोठं योगदान आहे
अगदी कमी पैशांत किंवा मोफत आयुर्वेदानं मानवाला निरोगी आयुष्य दिलंय , आज आपण अश्याचं एका गुणकारी औषधी विषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि ती औषधी म्हणजे
” ब्राम्ही “

ब्राम्ही :

ब्राम्ही ही औषधी वनस्पती अतिशय गुणकारी आहे आणि ती हजारो वर्षापासून वापरली जातेय ,ब्राम्ही ह्या वनस्पती वर पांढरे , गुलाबी , रंगाची फुले उमलतात , ब्राम्ही ही वनस्पती जमिनीवर पसरलेली असते . ही वनस्पती खूप आरोग्यदायी आहे ,आणि तिचे अनेक प्रकारचे फायदे देखील आहेत.ब्राम्ही ह्या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव ” Bacopa monnieri ” असे आहे , ब्राम्ही ही मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास खूप मदतगार ठरते .

ब्राम्हीय आरोग्यदायी लाभ

१) केसांचे पोषण करण्यास उपयुक्त

ब्राम्हीचा वापर हा केस काळेभोर आणि लांब करण्यासाठी मोठ्याप्रमाणात केला जातो , अनेक कंपण्यानच्या आयुर्वेदिक हेअर ऑईल मध्ये ब्राम्हीचा वापर हा केलेलाचं असतो .

२) स्मरण करण्यास मदत

ब्राम्हीचा वापर हा मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो , ब्राम्ही ही माणसाचं मन एकाग्र करते आणि डोकं शांत करते आणि स्मरण शक्ती वाढवते , ब्राम्ही ही पावडर स्वरूपात सुद्धा उपलब्ध असते आणि तिचे सेवन दुधातून किंवा पाण्यातूनसुद्धा केले जाते , त्याच प्रमाणे ब्राम्ही ही अल्झायमर मध्ये सुद्धा उपयुक्त मानली जाते

३) तीव्र आणि अँक्सिएटीवर ( चिंता ) उपयुक्त

ब्राम्ही ही कॉर्टिसोल ( Cortisol ) हार्मोनची पातळी कमी करून तणाव कमी करण्यास मदतगार ठरते त्याचप्रमाणे ब्राम्हीचा
अँटीअँक्सिएटी ( Antianxiety ) म्हणून सुद्धा वापर केला जातो

4) अँटीऑक्सिडंट ( Antioxidant ) म्हणून उपयोग

ब्राम्हीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे ब्राम्ही ही शरीरातील फ्री रँडीकल्स ( free radicals ) कमी करून तणाव , अँक्सिएटी कमी करते , त्याच प्रमाणे शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवून अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करते .

5) कर्करोग विरोधी गुणधर्म

प्राण्यांवर संशोधनानुसार ब्राम्हीमध्ये अँटीकॅन्सर ( Anticancer ) गुणधर्म असल्याचं सांगितलं गेलं आहे , ब्राम्ही ही अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये वापरली जाऊ शकते .

6) पोटाच्या विकारांमध्ये गुणकारी

अनेकवेळा ब्राम्हीचा वापर हा स्टमक अल्सरमध्ये सुद्धा ( Stomach Ulcer ) केला जातो . आणि ब्राम्ही स्पासमोलायटीक सुद्धा असल्यामुळे पोटदुखी मध्ये लाभदायक ठरते .

7) सर्दी , खोकला आणि नाकबंद मध्ये लाभदायी

गेल्या अनेक वर्षांपासून सर्दी , खोकला आणि नाकबंद मध्ये अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला जातोय , आणि त्यात ब्राम्ही सुद्धा फार लाभदायी ठरलेली आहे .

8) मधुमेहामध्ये उपयोगी

ब्राम्हीचा उपयोग हा मधुमेह रुग्णांमध्ये सुद्धा केला जातो . ब्राम्ही ही रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करते .

9) निद्रानाशमध्ये गुणकारी

ब्राम्ही तेलाचा वापर हा डोक्याची मालिश करण्यासाठी केला जातो , त्यामुळे निद्रानाशेचा त्रास हा बऱ्यापैकी कमी होतो आणि चिंता , तणाव सुद्धा कमी होण्यास मदत होते .

10 ) त्वचेचं संरक्षण करते

ब्राम्हीयुक्त क्रीम किंवा तेल त्वचेवर लावण्याने अनेकप्रकारच्या किटाणूपासून त्वचेचं संरक्षण होते आणि त्वचा मुलायम ठेवण्यास सुद्धा मदत होते .

ब्राम्ही ही आयुर्वेदिक औषधी बाजारामध्ये टॅबलेट , कॅप्सूल , पावडर , तेल , क्रीम ह्या वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असते

ब्राम्हीचे साईड इफेक्ट | Side effects of Bramhi

ब्राम्हीचं अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे डोकेदुखी , मळमळ होणे , तोंड कोरडे पडणे , चक्कर येणे , धडधड होणे यासारखा त्रास होऊ शकतो .

टीप : स्तनपानात किंवा गरोदरपणात ब्राम्हीचा वापर हा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं करावा

महत्वपूर्ण सूचना : वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे . आम्ही कुठल्याही प्रकारची आयुर्वेदिक औषधी वापरण्याचा सल्ला देत नाही , आणि कुठलीही आयुर्वेदिक औषधी वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *