ह्या 10 टिप्स आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतील | healthy tips for Heart
हल्लीच्या काळात खूप कमी वयामध्ये अनेकांना हृदयविकाराचा धोका निर्माण झालाय. त्याला महत्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली , कामाचा व्याप , चिंता , तणाव , खानपान , दारू सिगारेट चे व्यसन आणि शारीरिक व्यायमाचा अभाव इ. ,परंतु आपण काही गोष्टींचं पालन करून आपलं हृदय नेहमी निरोगी ठेऊ शकतो म्हणून आज आपण आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही निवडक हेल्थ टिप्स बघणार आहोत .
1) नियमित व्यायाम :
व्यायाम ही अशी गोष्ट आहे जी अनेक लहान मोठे आणि गंभीर आजारांपासून माणसाला दूर ठेवते .दररोज कमीत कमी 45 मिनिट व्यायाम हा झाला पाहिजे .व्यायामामूळे शरीलाला मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि त्यामधून अनेक प्रकारचे घातक टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडतात आणि शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे आपलं शरीर आणि हृदय निरोगी होण्यास फार मदत होते , व्यायामाबरोबरचं योगा आणि मेडिटेशन करणे फार फायदेशीर ठरते.
2) योग्य आहार :
हृदय निरोगी ठेवण्यामध्ये पोषक आहाराची फार मोठी भूमिका असते , त्याकरता आपला आहार हा कधीही Whole Grains युक्त असायला हवा कारण त्यात जास्त मात्रामध्ये फायबर असल्या कारणाने बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते आणि ब्लडप्रेशर सुद्धा नियंत्रणात राहते , त्यानंतर आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर असायला हवा आणि त्यासोबत फळांचाही कारण त्यापासून आपल्या हृदयाला पोषक असणारे व्हिटॅमिन्स , मिनरल , आणि फायबर्स मिळून जातात . आपल्या आहारामध्ये दररोज मिठाचं प्रमाण हे 2,300 Mg (मिलिग्राम) पेक्षा कमी असायला हवं ,जेणेकरून आपल्याला हाय ब्लडप्रेशर ची समस्या उद्भवणार नाही , तेल हे नेहमी बदलून बदलून खाल्लं गेलं पाहिजे , आणि ते ऑलिव्ह ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल असलं तर अधिक चांगल , बाहेरील तेलकट , तुपकट आणि स्पायसी पदार्थ खाणे जास्तीत जास्त टाळावे आणि अधिक व्यसन करणे सुद्धा टाळावे .
3 ) तणावचे ( स्ट्रेस ) मॅनेजमेंट :
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव , चिंता कोणाला नसते , ती प्रत्येकालाचं असते परंतु अती तणाव हा शरीरासाठी खूप धोकेदायक असतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर आणि हृदयावर होतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात , जसे की हृदयाची धडधड वाढणे , श्वास फुलणे , आणि ब्लडप्रेशर वाढणे इ .त्याकरिता तणाव नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे . तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज मेडिटेशन करणे हा उत्तम मार्ग आहे , मेडिटेशन मुळे डोकं शांत राहत आणि डोक्यात येणाऱ्या निगेटीव्ह विचारांना आळा बसतो . मेडिटेशन बरोबरचं व्यायाम , योगा सुद्धा मदतगार ठरतो , तणाव नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे . वाचन , लिखाण , चित्रपट बघणे किंवा आपले छंद जोपासणे हे बऱ्यापैकी तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरतात , आपल्या समस्या आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर केल्याने तणावाचा भार काहीसा कमी होतो आणि तणावाची समस्या दिवसेंदिवस वाढत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे .
4) कोलेस्टेरॉल (Cholesterol ) नियंत्रणात ठेवणे :
बॅड कोलेस्टेरॉल हे हृदयासाठी फार धोकेदायाक आहे त्यामुळे ते नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे , कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात जास्तीत जास्त Whole Grains चा आणि हिरव्या पालेभाज्यांचा वापर असायला हवा , तसेच तेलकट , तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे .
5) ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे :
ब्लडप्रेशर हे हृद्यविकारांना कारणीभूत ठरणारे सगळ्यात मोठे रिस्क फॅक्टर ( Risk Factor ) आहे , त्याकरिता ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे , ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारामध्ये आपल्याला मीठ कमी करणं गरजेचं आहे .त्याच बरोबर एक्सरसाईस ( Exercise ) , योगा आणि मेडिटेशन महत्वाचे आहे , ब्लडप्रेशर हे नियमित चेक करणं आवश्यक आहे आणि ब्लडप्रेशर च्या गोळ्या ह्या कधीच स्वतःच्या मनाने घेऊ नका त्याकरता तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे .
6) मधुमेह ( Diabetes ) नियंत्रणात ठेवणे :
आपल्या सगळ्यांना माहीतचं आहे की मधुमेह हा संपूर्ण शरीरासाठी धोकेदायाक मानला जातो . आणि त्याचबरोबर तो हृद्यविकारांसाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो त्यासाठी मुधुमेह हा नेहमी नियंत्रणात असला पाहिजे त्याच बरोबर योग्य आहार आणि शारिरीक व्यायाम करणं गरजेचं आहे , मधुमेहाची नियमित चाचणी करणं आवश्यक आहे त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू असणाऱ्या मधुमेहाच्या गोळ्या नियमित घेतल्या गेल्या पाहिजे , आणि मधुमेहा विषयी कुठलीही अडचण असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .
7) शारीरिक वजन नेहमी नियंत्रणात ठेवा :
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की अति शारीरिक वजन हे आपल्या शरीरासाठी खूप धोकेदायाक आहे , आणि त्यामुळे आपल्या हृदयाला सुद्धा हानी पोहचू शकते , त्याकरिता अतिवजन असल्यास ते डॉक्टरांच्या किंवा डायटेशियन्स ( Dietetions) यांच्या सल्ल्याने नियंत्रणात ठेवणे गरजेचं आहे .
8) स्मोकिंग ( Smoking ) पासून दूर रहा :
स्मोकिंग ( Smoking ) हे हृदयासाठी फार धोकेदायाक आहे त्यामुळे अनेक प्रकारचे हृदयविकार उद्भवू शकतात आणि त्याचबरोबर फुफ्फुसा संबंधी सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून स्मोकिंग पासून जेवढं दूर राहता येईल तेवढं चांगलं .
9) पुरेशी झोप घेणे :
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे , की शरीरासाठी झोप किती महत्वाची आहे ते . जेवढं शरीरासाठी काम महत्त्वाचं तेवढीच झोप सुद्धा महत्वाची आहे , रात्री अति जागरण करणं हृदयासाठी धोकेदायाक ठरू शकत आणि ज्यांना उच्चरक्तदाब (High Blood Pressure ) आहे त्यांनी तर पुरेशी झोप घेणं अतिशय महत्त्वाचं आहे . दररोज कमीत कमी सहा तास आणि जास्तीत जास्त सात ते आठ तास झोप शरीरासाठी गरजेचं आहे .
10) वैद्यकीय चाचण्या :
हल्लीच्या धकाधकीच्या काळात हृदयाची जास्त काळजी घेणं आवश्यक झालेलं आहे , त्याकरिता वर्षातून दोनदा किंवा एकदा तरी हृदया संबंधीत वैद्यकीय चाचण्या ह्या आपण करून घेतल्या पाहिजेत . जेणेकरून भविष्यात निर्माण होणाऱ्या शारिरीक समस्या आपल्याला लवकर टाळता येतील .
महत्वपूर्ण सूचना : वरील असलेला मजकूर ( कंटेंट ) हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे , आम्ही आमच्या लेखांमधुन कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देत नाही , त्याचप्रमाणे तुम्हाला कुठलीही शारिरीक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .
2 Comments