जाणून घ्या जटामांसी ह्या आयुर्वेदिक औषधीचे लाभदायी फायदे | benefits of Jatamansi

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कोरोना महामारीत रुग्णांच्या उपचारासाठी ऍलोपॅथी बरोबरचं आयुर्वेदाचंही खूप मोठं योगदान आहे , हजारो वर्षापासून अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती ह्या वेगवेगळ्या आजारावर वापरल्या जात आहे आणि त्या अति गुणकारी सुद्धा ठरत आहेत , आज आपण अश्याच गुणकारी ” जटामांसी ” ह्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे फायदे , तोटे आणि माहिती जाणून घेणार आहोत.

जटामांसी :

जटामांसी ही प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी औषधी वनस्पती आहे , जटामांसी ही एक प्रकारची फुलांची वनस्पती आहे , ही औषधी वनस्पती व्हॅलेरियानी कुटुंबातील आहे , जटामांसी या औषधी वनस्पतीचं वैज्ञानिक नाव नार्डोस्टाचिस जटामांसी असं आहे , ह्या वनस्पतीचे फुले ही बेलाच्या आकाराची गुलाबी रंगाची असतात , जटामांसी या वनस्पतीची उंची साधारण एक ते दीड मीटर पर्यंत असते .आणि ह्या वनस्पतीच्या लागवड भारत , नेपाळ , या भागात केली जाते ,जटामांसी या औषधी वनस्पती मध्ये अनेक प्रकारचे महत्वपूर्ण घटक आहेत .जटामांसी ही कॅप्सूल , टॅबलेट , ऑइल आणि चूर्ण प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

जटामांसी चे आरोग्यदायी लाभ !

1) उच्चरक्तदाब कमी करते
अनेक जणांना उच्चरक्तदाबाची (हाय ब्लडप्रेशर) समस्या असते आणि त्यामध्ये जटामांसी ही औषधी वनस्पती हाय ब्लडप्रेशर कमी करण्यास फार मददगार ठरते .
2) अँटीबेक्टरीअल आणि अँटीफंगल म्हणून उपयोग
जटामांसी ही औषधी वनस्पती अनेक प्रकारच्या बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन मध्ये सुद्धा वापरली जाते
3) मानसिक स्वास्थ्य सुधारते
जटामांसी ही औषधी वनस्पती डोकेदुखी , ताणतणाव , अँक्सिएटी , झोपेचा अभाव , त्याचप्रमाणे चक्कर येणे यावर फार गुणकारी आहे .
4) पचनक्रिया वाढवण्यास मदत
अनेक जणांना पोटासबंधी खूप समस्या असतात , जसे की बद्धकोष्ठता , गॅस , पोटदुखी , अपचन इ.वर जटामांसी ही उपयोगी मानली जाते .
5) निद्रानाश कमी करण्यास मदत करते
ताणतणाव आणि चिंतेमुळे अनेक जणांना निद्रानाशेची समस्या सतावत असते , निद्रानाश सुधारण्यासाठी जटामांसी चा वापर केला जातो .
6) मिरगी मध्ये उपयोगी
जटामांसी ही वनस्पती वारंवार येणारे मिरगीचे दौरे हे कमी करण्यास मदतगार ठरू शकते
7) हृदयाचे स्वास्थ्य
जटामांसीमध्ये अँटीऑक्सिडंटस असल्यामुळे ते ऑक्सीडेटिव स्ट्रेस कमी करून हृदयाचा हृदयविकारांपासून बचाव करण्यास मदत करते
8) केसांकरिता उपयुक्त
केसांसाठी जटामांसी ही फार उपयोगी मानली जाते , केसगळती कमी करण्यास आणि काळेशार घनदाट केस होण्यास फायदेशीर ठरते .
9) अँक्सिएटीवर गुणकारी
जटामांसी ही डोकं शांत करून अँक्सिएटीची लक्षणे मॅनेज करण्यास फार उपयुक्त ठरते .
10) ब्रेन टॉनिक म्हणून उपयोग
जटामांसीचा वापर ब्रेन टॉनिक म्हणून सुद्धा केला जातो ती बौद्धिक क्षमता वाढवण्यास फायदेशीर ठरते .

जटामांसीपासून होणारे नुकसान , Side Effects Of Jatamansi

● जटामांसीच्या अतिसेवनामुळे पोटदुखी आणि डायरिया सारखी समस्या निर्माण होऊ शकते.
● कोणाला कोणाला जटामांसी ह्या औषधीमुळे ऍलर्जी होऊ शकते.
● गर्भावस्थेत आणि स्तनपानात जटामांसी चा उपयोग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
● जटामांसीचं सेवन स्वतःच्या मनाने करू नये , त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊ शकतो , अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

महत्वपूर्ण सूचना : वरील मचकुर ( कंटेंट ) हे फक्त माहितीसाठी आहे आम्ही कुठल्याही प्रकारची आयुर्वेदिक औषधी वापरण्याचा सल्ला देत नाही , कुठलीही औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं घ्यावीत .

Important Notice: The above content is for informational purposes only, we do not recommend the use of any Ayurvedic medicines, any medicines are requested to be taken under the advice of a doctor.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *