बिट खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health benefits of beetroot in marathi
बिट खाण्याचे आरोग्यदायी फायदे | Health benefits of beetroot in marathi
बीट हे आपल्यासाठी काही नवीन नाही ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि ते बाजारात अगदी सहजही मिळून जातं आणि तेही अगदी स्वस्त , चवीला थोडं गोड आणि थोडं तुरट परंतु आपल्याला बिटचे लाभदायी फायदे माहिती आहेत का ? नाही ना , तर चला आज आपण आपल्या ह्या आरोग्यदायी लेख मध्ये बिट खाण्याचे काय काय फायदे आहेत ते बघुयात .
बीटमध्ये असणारे महत्वपूर्ण घटक कोणते ?
फायबर , प्रोटीन , कार्बोहायड्रेट ,मॅग्नेशिम , पोटॅशिअम , फोलेट , व्हिटॅमिन बी 6 , व्हिटॅमिन सी आणि आयरन इ .
बिट खाण्याचे फायदे काय आहेत ?
1) रक्त वाढण्यास उपयुक्त ठरते
बीटमध्ये लोहाचे प्रमाण असल्यामुळे ते रक्तवाढीसाठी फार उपयुक्त ठरते . त्यासाठी बीट कापून खावे किंवा त्याचा अर्धा ग्लास ज्युस जरी घेतला तरी तो फार गुणकारी ठरतो .
2) बीटमूळे शरीरातील स्टॅमिना वाढतो
बीटचा रस पिल्यामुळे व्यायामासाठी लागणाऱ्या स्टॅमिन्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते .त्याकरता दरोरोज अर्धा ग्लास बीट चा रस घेणं उपयुक्त ठरतं .
3) बीटमूळे रक्तदाब नियंत्रणात राहते
उच्च रक्तदाबाची ( High Blood Pressure ) समस्या फार गंभीर असते त्याकरता रक्तदाब नियंत्रणात ठेवणे फार गरजेचे आहे आणि बीटचा रस रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फार उपयोगी ठरतो.कारण त्यामध्ये नायट्रेटस असतात .
4) बीट कॅन्सरचा धोका कमी करते
बीट मध्ये असे काही घटक आहेत जे कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्याचं काम करतात त्याकरता दररोज एक कप बीट चा रस घेणं उपयोगी ठरत
5) मानसिक स्वास्थ्य राखण्यास उपयोगी
बीट हे मेंदूचे स्वास्थ चांगलं राखण्यास उपयोगी ठरते ताण तणाव कमी करण्यास मदत करते त्याचप्रमाणे मेंदूसंबधी आजारांचा धोका सुद्धा कमी करण्यास उपयुक्त ठरते .
6) पाचनक्रिया वाढवण्यास उपयुक्त ठरते
बीट मध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे ते पोटातील चांगले बॅक्टेरीया वाढवण्यास मदत करते आणि पोट साफ करण्याचे काम करते आणि त्याच बरोबर रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवण्याचं काम करते .
7) शरीरातील दुखणे कमी करण्यास लाभदायी
बीटमध्ये अँटीइन्फलामेंटरी ( Anti-inflammantory ) गुणधर्म असल्याने ते शरीरातील दुखणे जसे की जॉइन्ट्स पेन कमी करण्यास उपयोगी ठरते .
8) खेळाडूंची कार्यक्षमता वाढवण्यास लाभदायी
कुठलाही खेळ खेळण्यासाठी शरीरामध्ये स्टॅमिण्याची फार गरज असते आणि त्यासाठी दररोज एक कप बिटचा रस घेणं फार लाभदायी ठरतं .
बीटचे सेवन कसे करावे ?
बीट खाण्याची साधी आणि सोपी पद्धत म्हणजे ते कापून खाणे परंतू बीटचा रस हा फार गुणकारी असतो . दरोरोज तुम्ही बीटचा अर्धा ते एक कप रस घेऊ शकता .
बीटचा रस ( ज्यूस ) कसे करावे ?
बिटचा रस करणे फार काही कठीण नाही ते कोणीही करू शकतं .सर्वप्रथम अर्धा ते एक बीट घावे त्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत . ते सगळे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकावेत व त्यासोबत एक छोटा तुकडा अद्रकचा टाकावा त्यानंतर त्यात थोडं शुद्ध पाणी टाकावं नंतर ते सर्व मिश्रण फिरवून त्याची पातळ पेस्ट करावी . त्यानंतर ती सर्व पेस्ट एका फडक्याने किंवा चाळनिणे गाळून घ्यावे . आणि तयार झाला तुमचा बीटचा रस .
बीट कोणी खाणे टाळावे ?
ज्यांना मुतखडा आणि लो बीपीचा त्रास आहे त्यांनी बीट खाऊ नये किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा
दररोज बीट खाल्यामुळे लघवी आणि संडास लाल होऊ शकते त्याकरता घाबरून जाण्याचं कारण नाही .
टीप- वरील लेख हा फक्त एक सामान्य माहितीसाठी आहेतुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .