लिंबू खाण्याचे फायदे | benefits of lemon
लिंबू खाण्याचे फायदे :
लिंबू म्हटलं की सगळ्यांच्याचं तोंडाला पाणी येत , आपलं जेवण अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी लिंबू फार उपयोगी पडतो त्याच प्रमाणे उन्हाळ्यामध्ये उन्हापासून वाचण्यासाठी लिंबू सरबत हे फार गुणकारी असतं .परंतू आपल्याला माहीत आहे का ? की लिंबू मध्ये किती औषधीय गुण आहेत ते . तर चला आज आपण आपल्या ह्या लेखमध्ये लिंबूच्या लाभदायी फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत .
लिंबूमध्ये कोणते महत्वाचे घटक आहेत ?
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते त्याचप्रमाणे लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड ( citric acid ) , फायबर , पोटॅशिअम , आणि व्हिटॅमिन बी6 असते .
लिंबू खाण्याचे फायदे कोणते ?
1) हृदय निरोगी ठेवते
लिंबूमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते , आणि दररोज लिंबूच्या सेवनामुळे हृद्यविकारांपासून बऱ्यापैकी संरक्षण मिळते .
2) किडनी स्टोन होण्यापासून बचाव होतो
दररोज एक ते दोन कप लिंबू पाणी घेतल्यास किडनी स्टोन तयार होण्यापासून बचाव होतो कारण लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते ते किडनी स्टोनला प्रतिबंध करते .
3) लिंबू पचनक्रिया सुधारण्यास लाभदायी
बऱ्याच जणांना जेवणानंतर लिंबूपाणी घेण्याची सवय असते कारण त्यामुळे जेवणानंतर होणारा पोटाचा त्रास टाळता येतो , लिंबूमध्ये फायबर असल्या कारणाने ते पोटाच्या समस्यांवर लाभदायी ठरते आणि पचनक्रिया सुद्धा सुधारते .
4) अनेमियाचा धोका कमी होतो
लिंबूमध्ये काही प्रमाणात आयरन असल्यामुळे ते आयरन च्या कमतरतेमुळे होणारा अनेमियाचा धोका कमी होतो
5) वजन कमी करण्यास उपयोगी
दररोज अर्धा ग्लास कोमट पाण्यात लिंबू घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते किंवा वजन नियंत्रणात सुद्धा राहते
6) कॅन्सरचा धोका कमी होतो
लिंबूमध्ये काही प्रमाणात अँटी-कॅन्सरचा गुणधर्म असल्या कारणाने . दररोज लिंबू सरबत घेतल्यास कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते
7) त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते आणि त्वचेवरील सुरकुत्या सुद्धा कमी करण्यास मदत करते.
8) शरीरातील ऊर्जा वाढवते
दिवसभराची दगदग आणि कामाचा थकवा लिंबू सरबत घेतल्याने बऱ्यापैकी कमी होतो , कारण लिंबूमध्ये अनेक उर्जादेई घटक असतात आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा ( शक्ती ) वाढण्यास मदत होते .
9) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास लाभदायी
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास सुद्धा फार मदत होते , आणि सर्दी , खोकल्यापासून आपला बचाव होतो .
10) उन्हाळ्यामध्ये खूप गुणकारी
उन्हाळयात आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर त्यांना लिंबू सरबत देतो कारण लिंबू सरबतमुळे शारीरिक थकवा कमी होतो आणि शरीरातील पाण्याची कमतरता सुद्धा भरून निघते , उन्हाळ्यामध्ये दररोज एक ग्लास लिंबू सरबत घेतल्यामुळे उष्माघातापासून सुद्धा संरक्षण होते .
लिंबूचे सेवन कसे करावे ?
खालील पैकी आपण कोणत्याही एका पद्धतीने लिंबूचे दररोज सेवन करू शकतो .
● आपण दररोज जेवणामध्ये एक लिंबू खाऊ शकतो
● दररोज एक ते दोन कप लिंबू सरबत घेऊ शकतो
● लिंबूचे लोणचे
● अर्ध्या ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू
लिंबूपासून होणारे दुष्परिणाम कोणते ?
लिंबूमुळे ऍलर्जी होऊ शकते किंवा छातीमध्ये जळजळही होऊ शकते आणि लिंबूमध्ये आंबटपणा असल्यामुळे तुमचे दातही दुखू शकतात .
टीप- वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलाही शारिरीक त्रास असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .