लवंग खाण्याचे गुणकारी फायदे | Health benefits of Clove

लवंग खाण्याचे लाभदायी फायदे | Health Benefits of Cloves

लवंग आपल्या सगळ्यांना माहीतच आहे तो आपल्या घरामध्ये मसाल्यात वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे .त्याचप्रमाणे लवंगाला आयुर्वेदामध्ये खूप महत्वाचे मानले जाते . लवंग हा अनेक शारीरिक समस्यांवर गुणकारी आहे . लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत त्याचप्रमाणे लवंगाचा अँटी-बॅक्टेरियल सुद्धा गुणधर्म आहे .लवंग हे आपल्या घरामध्ये सर्दी , खोकला , दहाड दुःखी किंवा तोंडाची दुर्गंधी यामध्ये प्रथमोपचार म्हणून वापरले जाते .

लवंग हे लवंगाच्या झाडांच्या फुलांचे देठ आहे ते दिसायला तपकिरी रंगाचे आहे आणि सुगंधी सुद्धा आहे .लवंगाची लागवड ही भारताच्या अनेक भागामध्ये केली जाते .लवंगामध्ये अनेक महत्वाचे पोषकतत्वे आहेत जे आपल्या शरीरासाठी लाभदायी आहे.

लवंगामधील महत्वाचे पोषकतत्वे कोणते ?

● कॅलरीज ( Calories )
● फायबर ( Fibar )
● प्रोटीन ( Protin )
● कार्बोहायड्रेट ( Carbohydrates )
● मॅगनीज ( Manganese )
● व्हिटॅमिन के ( Vitamin K )
● युजेनॉल ( eugenol )

लवंगाचे लाभदायी फायदे कोणते ?

लवंग हे आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो

1) अन्नपचन होण्यास मदत ( Help in Digestion )

दररोज जेवणानंतर एक लवंग चघळल्यास अन्नपचन होण्यास मदत होते कारण लवंगामध्ये फायबर असते त्याचप्रमाणे पोटातील गॅस , पोट गच्च होणे यापासून सुद्धा आराम मिळतो.

2) तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत ( Help in Oral Health )

लवंगमध्ये अँटी-मिक्रोबीएल गुणधर्म असल्यामुळे लवंग तोंडामध्ये असणारे घातक जंतू मारण्याचे काम करते त्यामुळे दात हे निरोगी राहतात आणि तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होते.

3) अँटी-ऑक्सिडंट म्हणून उपयुक्त ( Anti-Oxidant )

लवंगामध्ये अतिशय महत्वाचा युजेनॉल हा अँटी-ऑक्सिडंट घटक असतो त्यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी होतो आणि त्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं.

4) कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यास मदत ( Reduce Cancer Risk )

लवंगामध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असल्यामुळे लवंग हे कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते त्याचप्रमाणे
लवंगमधील अँटी-ऑक्सिडंट हे कॅन्सर रोखण्याचं काम करते

5) लिव्हरचे कार्य वाढवण्यास मदत ( Improve Liver Work )

लवंग तेलामध्ये असणारे युजेनॉल हे लीव्हरची कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते आणि त्यामुळे लिव्हर हे मजबूत होण्यास मदत होते ज्यामुळे लिव्हर संबंधी समस्यांचा धोका कमी होतो.

6) हाडे मजबूत करण्यास उपयोगी ( Help in Bone Health )

लवंगमधील युजेनॉल आणि मॅगनीज हे हाडे मजबूत करण्यास उपयोगी ठरतात त्याचप्रमाणे लवंग मध्ये अँटी-इंफ्लामेंटरी गुणधर्म असल्यामुळे दुखणे आणि सूज कमी होण्यास मदत होते.

7) तणाव कमी करण्यास उपयोगी ( Reduce Stress )

लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आहेत त्यामुळे ते शरीरातील फ्री रॅडीकल्स कमी करून तणाव कमी होण्यास मदत होते त्याच प्रमाणे लवंग तेल कपाळाला लावल्यास डोकेदुखी सुद्धा कमी होते.

8) वजन कमी होण्यास मदत ( Help in Weight Loss )

वजन कमी करण्यासाठी लवंग ही गुणकारी मानली जाते त्यासाठी दररोज एक कप लवंग घातलेले पाणी पिल्यास शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते

कश्यामध्ये लवंग घरगुती उपाय म्हणून कामी येईल ?

● डोकेदुखी झाल्यास लवंगतेल कपाळाला लावावे
● दातदुखी किंवा दाढदुखी झाल्यास कापसाच्या बोळ्यावर थोडं लवंग तेल टाकून तो बोळा दाताखाली किंवा दाढेखाली दाबून ठेवावा
● तोंडाची दुर्गंधी येत असल्यास एक लवंग चघळावा
● अन्नपचन न झाल्यास व पोटात गॅस झाल्यास एक लवंग चावून खावावा
● त्याचप्रमाणे लवंग हे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांवर उपयोगी आहे परंतु त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लवंगामुळे होणारे दुष्परिणाम कोणते ?

● लवंग खाल्यामुळे तोंडात आणि घश्यात जळजळ होऊ शकते
● लवंगतेल पिल्यामुळे लिव्हरला धोका निर्माण होऊ शकतो
● लवंगतेल हातापायाला लावल्यास त्याची ऍलर्जी होऊ शकते

लवंगाचे सेवन कोणी करू नये ?

● लहान मुलांना लवंग किंवा लवंगतेल देऊ नये
● दातांवर काही उपचार चालू असल्यास लवंग खाण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
● मधुमेहामध्ये लवंगाचे सेवन करण्याअगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण लवंगामुळे रक्तातील साखर एकदम कमी होण्याचा धोका असतो
● ज्यांना रक्त पातळ करण्याच्या औषधी सुरू आहेत त्यांनी लवंग खाणे टाळावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

टीप-वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा : जाणून घ्या हळद खाण्याचे फायदे

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *