छातीत जळजळ होण्याची कारणे आणि घरगुती उपाय | Heartburn
आपली बदलेली जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेकांना छातीत जळजळ म्हणजेच हार्ट बर्न होण्याची समस्या उद्भवत असते . दररोज कामाची दगदग , मसालेदार , तेलकट , तिखट , आंबट खानपान , धूम्रपान , झोपेचा अभाव , मानसिक तणाव यामुळेसुद्धा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो.
छातीत जळजळ होणे ही काही साधारण समस्या नाही त्यावर लवकर इलाज न झाल्यास ती आपल्या शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते छातीत जळजळ होणे आणि त्याचबरोबर आपल्याला अनेक प्रकारचे लक्षणे दिसून येतात.
छातीत जळजळ होण्याबरोबरच इतर कोणते लक्षणे दिसून येतात ?
● छातीबरोबरच पोटात सुद्धा जळजळ होऊ शकते
● घश्यात जळजळ होणे
● पोटात दुखणे किंवा गॅसेस होणे
● आंबट ढेकर येणे आणि तोंडात कडू पाणी येणे
छातीत जळजळ होण्याची कारणे – Cause of Hurtburn
● पोटात असणारे ऍसिड ज्यावेळेस अन्ननलिके मध्ये वर येते तेव्हा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो
● जास्तवेळ उपाशी राहिल्याने सुद्धा छातीत जळजळ होते
● मसालेदार , तिखट , खारट , तेलकट पदार्थ अति प्रमाणात खाल्यामुळेसुद्धा छातीत जळजळ होऊ शकते .
● चहा , कॉफी , कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते
● धूम्रपान , मद्यपान यामुळेसुद्धा छातीत जळजळ होते
● मानसिक ताण तणाव , रात्रीचे जागरण करणे
● अवेळी जेवण करणे यामुळे सुद्धा छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो
छातीत जळजळ झाल्यास कोणते घरगुती उपाय करावे ?
छातीत होणारी जळजळ बंद होण्यासाठी किंवा त्यापासून आराम मिळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या औषधी उपलब्ध आहेत परंतु छातीतील जळजळ बंद होण्यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा फायदेशीर ठरतात .
1) छातीत जळजळ होत असल्यास त्वरित आराम मिळण्यासाठी थंड दूध घ्यावे त्यामुळे छातीतील जळजळ कमी होण्यास फार मदत होते.
2) केळी खाल्याने सुद्धा छातीत होणारी जळजळ कमी होण्यास फार मदत होते.
3) जेवणानंतर बडीशोप खाल्याने अन्नपचनही व्यवस्थित होते आणि छातीत होणारी जळजळ सुद्धा कमी होण्यास मदत
तणाव कमी करण्यासाठी ह्या दहा गोष्टी लक्षात ठेवा
छातीत जळजळ होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी ?
● गरज नसतांना जास्त अन्न खाऊ नये
● जास्त वेळ उपाशी राहू नये
● जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये
● वातीव पदार्थ खाणे टाळावे
● जेवनाची वेळ फिक्स असावी
● जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये
● धूम्रपान , मद्यपान करणे टाळावे
● दररोज व्यायाम करावा
● पुरेसे पाणी प्यावे
● मानसिक ताण घेणे कमी करावे
● रात्रीचे जागरण टाळावे व पुरेशी झोप घ्यावी
● पेन किलरच्या गोळ्या जास्त घेऊ नये
● चहा , कॉफी , कोल्ड्रिंक्स अति प्रमाणात पिऊ नये
● तिखट , खारट , मसालेदार , तेलकट पदार्थ अति खाणे टाळावे
छातीत जळजळ होत असल्यास दुर्लक्ष करू नये :
छातीत जळजळ होणे ही समस्या सामान्य आहे ती आपल्याला आपल्या खानपाना मुळे सुद्धा उद्भवू शकते परंतु सतत छातीत जळजळ होत असेल तर ते गॅस्ट्रोईसोफेगल रिफ्लक्स डिसीज (GERD) चे लक्षण असू शकते . त्याकरता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
प्रत्येकवेळी छातीत होणारी जळजळ ही सामान्य नसू शकते त्याकरता छातीत जळजळ होण्यासोबत छातीत दुखणे , श्वास घेण्यास त्रास होणे , जबडा दुखणे , घाम येणे , अस्वस्थ वाटणे , खांदा दुखणे , चक्कर येणे , उलटी मळमळ होणे यासारखी लक्षणे असतील तर त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप-वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.