डोकेदुखी चे प्रकार , कारणे आणि डोकेदुखी वर घरगुती उपाय

डोकेदुखी –

हल्लीच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाला डोकेदुखीचा त्रास हा असतोच आणि त्याची अनेक कारणेही आहेत , सामान्य डोकेदुखी ही मानसिक तणाव , कामाची दगदग , प्रवास , व्यसन , ऍसिडिटी , अयोग्य खानपान , अपूर्ण झोप , जागरण यामुळे होत असते .

काही व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी ही मायग्रेन डोकेदुखी , क्लस्टर डोकेदुखी , काही गंभीर आजार , आणि काही औषधींमुळे सुद्धा होते . डोकेदुखी ही खूप त्रासदायक असते बऱ्याच जणांना ती सहन होत नाही आणि त्यामुळे काही जण दररोज डोकेदुखीच्या गोळया देखील घेत असतात.त्याचप्रमाणे अनेक जणांमध्ये डोकेदुखी ही कंप्युटर , टीव्ही , मोबाईलच्या अतिवापरामुळे सुद्धा होत असते.

सामान्य डोकेदुखी ही काही मिनिटात विना औषधीची ठिकही होऊन जाते आणि डोकेदुखीवर काही घरगुती उपचारही गुणकारी ठरतात. परंतु सततच्या डोकेदुखी कडे दुर्लक्ष करणे हे त्रासदायक ठरू शकते . त्याकरता आपण डोकेदुखी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

डोकेदुखी ची कारणे – Cause of Headache in Marathi

● मानसिक तणाव
ऍसिडिटी
● दातांची समस्या
● अयोग्य खानपान
● अति चहा , कॉफीचे सेवन
● मद्यपान करणे
● धूम्रपान करणे
● पूर्ण झोप न होणे
● प्रदूषण , वातावरणातील बदल
● कामाची दगदग
● लांबचा प्रवास करणे
● टीव्ही , कंप्युटर , मोबाईलचा अतिवापर
● विविध आजारांमुळे
● डोकेदुखीचे आजार
● रात्रीचे जागरण
● सकाळी उशिरा उठणे
● हार्मोन कमी जास्त झाल्यामुळे
● वरील काही कारणांमुळे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो

हे सुद्धा वाचा : ओरल थ्रश विषयी माहिती जाणून घ्या

डोकेदुखीचे प्रकार – Types of Headache

डोकेदुखीचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांची वेगवेगळी लक्षणे आहेत , ते सर्व प्रकार आणि त्यांची लक्षणे आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

1) क्लस्टर डोकेदुखी (cluster headache)
2) सायनस डोकेदुखी (sinus headache)
3) थंडरक्लॅप डोकेदुखी (thunderclap headache)
4) अर्धशिशी डोकेदुखी (migraine headache)
4) तणावामुळे होणारी डोकेदुखी (tension headache)

● क्लस्टर डोकेदुखी (cluster headache)- क्लस्टर डोकेदुखीमध्ये तीव्र डोकेदुखी होते आणि एका डोळ्याच्या आजूबाजूला किंवा डोळ्याच्या मागे दुखू लागते त्याचबरोबर डोळा लाल होणे , सुजणे , डोळ्यातून पाणी येणे यासारखी लक्षणे दिसून येतात.क्लस्टर डोकेदुखी ही साधारण 20 मिनीटापासून ते 3 तासांपर्यंत राहू शकते.

● सायनस डोकेदुखी (sinus headache)- सायनस डोकेदुखी ही सर्दीमुळे होणारी डोकेदुखी आहे.कपाळाच्या खाली आणि नाकाच्या आजूबाजूला सर्दीमुळे कफ जमा होतो आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो त्याचबरोबर नाक बंदची समस्या सुद्धा उद्भवते.त्याला सायनाईटस असे सुद्धा म्हणतात.

● थंडरक्लॅप डोकेदुखी (thunderclap headache)- थंडरक्लॅप डोकेदुखी ही अतिशय भयंकर डोकेदुखी असते यामध्ये तीव्र वेदना होतात या डोकेदुखीमध्ये त्वरित उपचाराची गरज असते.थंडरक्लॅप डोकेदुखी ही मेंदूत रक्ताच्या गुठळ्या होणे , मेंदूतील रक्तस्राव , मेंदूची इजा आणि पिट्यूटरी ऍपोलेक्सी (pituitary apoplexy) या कारणांमुळे होते.

● अर्धशिशी डोकेदुखी (migraine headache)- अर्धशिशीचा त्रास हा बऱ्याच व्यक्तींमध्ये आढळून येतो या डोकेदुखीमध्ये डोक्याच्या अर्ध्या भागात खूप वेदना होतात त्याचबरोबर डोळ्यांसमोर अंधार , प्रकाश सहन न होणे यासारखा त्रास होऊ लागतो या डोकेदुखीबरोबर मळमळ उलटी होण्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो.

● तणावामुळे होणारी डोकेदुखी (tension headache)- तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीला टेंशन हेडेक असे म्हणतात ही डोकेदुखी अति चिंता आणि मानसिक तणावामुळे होते यामध्ये कपाळात वेदना होतात त्याबरोबर खांद्यामध्ये सुद्धा वेदना होतात ही डोकेदुखी औषध न घेताही बरी होते.

( वर दिलेल्या डोकेदुखीच्या काही प्रकारांमध्ये डॉक्टरांकडून उपचार घेण्याची अत्यंत गरज असते त्यामध्ये साधारण पेनकिलर किंवा घरगुती उपाय उपयुक्त ठरत नाहीत )

उच्चरक्तदाब ( High BP ) मूळे डोकेदुखी होते का ?
हो , उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये डोकेदुखीचा त्रास असतो परंतु काही व्यक्तींमध्ये हा त्रास होत नाही किंवा ज्यांचा बीपी हा नेहमी नियंत्रणात असतो त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत नाही.

हे सुद्धा वाचा : छातीत जळजळ होण्याची कारणे आणि घरगुती उपाय

डोकेदुखी होऊ नये यासाठी उपाय कोणते-

● मानसिक ताण कमी करावा
● योग्य आहार घ्यावा
● सकाळी व्यायाम आणि मेडिटेशन करावे
● मसालेदार , तळलेले पदार्थ कमी खावावेत
● रात्रीचे जागरण कमी करावे
● भरपूर पाणी प्यावे
● धूम्रपान , मद्यपान कमी करावे
● कॉम्प्युटर , टीव्ही , मोबाईलचा वापर कमी करावा

डोकेदुखी वर घरगुती उपाय कोणते-

(खाली दिलेले काही घरगुती उपाय हे सामान्य डोकेदुखीमध्ये आराम देण्यास मदत करतात)

● अनेकदा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा डोकेदुखी होते त्याकरता दिवसभर भरपूर पाणी प्यावे.
● लवंगाची बारीक पूड करून ती एका कपड्यात बांधावी आणि त्याचा सुगंध घ्यावा.
● सुंठ , जायफळ आणि वेखंड घासून त्याची पेस्ट करावी आणि ती हलकी गरम करून कपाळाला लावावी.
दालचिनीची पेस्ट करून ती कपाळाला लावावी.
● अद्रकचा एक तुकडा चघळावा किंवा चावून खावावा.
● खोबरेल तेल कोमट करून त्याने डोक्याची मालिश करावी

वारंवार डोकेदुखीसाठी (पेनकिलर) गोळ्या घेणे योग्य आहे का –

नाही , वारंवार स्वतःच्या मनाने डोकेदुखीसाठी पेनकिलर गोळ्या घेणे ह्या शरीरासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे शरीरातील अनेक अवयांना हानी पोहचू शकते परंतु तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

सततच्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नये –

प्रत्येक वेळेस डोकेदुखी ही साधारण नसते काही वेळेस ती इतर शारीरिक कारणांमुळे सुद्धा होते त्याकरता तुमचे डोके जर सतत तीव्र दुखत असेल तर त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे किंवा काही डोक्याच्या तपासण्या करून घेण्याची आवश्यकता असते.

टीप-वर दिलेली माहिती ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला आरोग्या विषयी कुठलीही समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

हे सुद्धा वाचा : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *