आवळा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे | Amala Juice Health Benefits

आयुर्वेदामध्ये आवळ्याला फार महत्व आहे तो हजारो वर्षापासून वेगवेगळ्या शारीरिक समस्यांमध्ये औषध म्हणून वापरला जातोय
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास अतिशय गुणकारी मानले जाते.त्याचप्रमाणे आवळ्यामध्ये बरेच असे महत्वपूर्ण घटक आहेत ज्याचे अनेक आजारांवर गुणकारी फायदे आहेत .

दररोज आवळा ज्यूस चे सेवन केल्याने हृदयविकार , त्वचाविकार , यकृताचे विकार , पोटाचे विकार , किडनी विकार इ यापासून बऱ्यापैकी संरक्षण मिळते .त्याचप्रमाणे आवळ्याच्या ज्युसचे अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत .आणि ते आपण आपल्या ह्या लेख मध्ये बघणार आहोत.

आवळ्यामध्ये असणारे महत्वाचे घटक कोणते ?

आवळ्यामध्ये अनेक असे महत्वपूर्ण घटक आहेत जे वेगवेगळ्या शारीरिक समस्यांवर खूप लाभदायी आहेत . आवळ्यामध्ये असणारे काही घटक हे खालील प्रमाणे आहेत.

● प्रोटीन ( Protein )
● फॅट ( Fat )
● कॅलरीज ( Calories )
● फायबर ( Fibar )
● कार्बोहायड्रेट ( Carbohydrates )
● आयरण ( Iron )
● कॅल्शियम ( Calcium )
● पोटॅशिअम ( Potassium )
● मॅग्नेशिअम ( Magnesium )
● झिंक ( Zinc )
● व्हिटॅमिन सी ( Vitamin C )
● व्हिटॅमिन अ ( Vitamin A )
● व्हिटॅमिन ई ( Vitamin E )

येथे क्लीक करून वाचा दुधी भोपळा खाण्याचे फायदे

आवळा ज्यूस पिण्याचे आरोग्यदायी फायदे – Health benefits of Amala Juice

आवळा ज्यूस पिण्याचे अनेक असे आरोग्यदायी फायदे आहेत त्यापैकी काही महत्वाचे फायदे आपण खाली बघणार आहोत.

● रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास गुणकारी

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास खूप गुणकारी ठरते आणि त्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं.

● हृदय निरोगी ठेवण्यासाठी गुणकारी

आवळा ज्युसच्या सेवनाने आपल्या शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल ( LDL ) कमी होण्यास मदत होते आणि त्यामुळे आपलं हृदय विकारांपासून संरक्षण होतं.आणि आपलं हृदय हे निरोगी होण्यास सुद्धा मदत होते.

● पचनशक्ती सुधारण्यास उपयुक्त

आवळा ज्यूस मध्ये अँटी-ऑक्सिडंट , फायबर असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्याचप्रमाणे ते पोटातील अलसर चा त्रास कमी करण्यास सुद्धा मदत करते.

● केस वाढीसाठी फायदेशीर

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट असते त्यामुळे आवळा ज्युस पिल्याने आणि आवळा तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस निरोगी सुद्धा होतात.

● यकृत आणि किडनी निरोगी ठेवण्यास मदत

आवळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी , अँटी-ऑक्सिडंट आणि असे काही महत्वपूर्ण घटक आहेत जे किडनी आणि यकृत निरोगी ठेवण्यास मदत करते.

● डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन अ असल्यामुळे ते डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

● त्वचा निरोगी ठेवण्यास उपयुक्त

दररोज आवळा ज्युसचे सेवन केल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते व त्वचा रोगांपासून संरक्षण होते कारण आवळ्यामध्ये
भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी , अँटी-ऑक्सिडंट असतात.

● मानसिक तणाव कमी करण्यास मदत

आवळ्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट हे शरीरात असलेले फ्री रॅडीकल्स कमी करून तणाव कमी करण्यास मदत होते त्याचप्रमाणे आवळा हा स्मरण शक्ती वाढवण्यास सुद्धा फायदेशीर ठरतो.

● रक्तातील साखर नियंत्रणात राहते

मधुमेह असलेल्यांनी आवळ्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

आवळा हा कोण कोणत्या प्रकारात खाण्यासाठी उपलब्ध असतो ?

आवळ्याचे सेवन हे अनेक प्रकारांमध्ये केलं जाऊ शकत त्याकरता बाजारात , आवळा ज्युस , आवळा कँडी , आवळा चूर्ण , आवळ्याचे लोणचे , आवळ्याचा मुरंबा आणि केसांसाठी आवळ्याचे तेल उपलब्ध असते.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिला , स्तनपान करणाऱ्या महिला , लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनी आवळा खाण्याअगोदर एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप-वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *