अंक्सिएटी ची कारणे आणि लक्षणे | Anxiety : Symptoms and Cause

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक लोकांमध्ये anxiety चं प्रमाण फार वाढलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे , anxiety काय असते ? का होते आणि त्यावर उपाय काय ? त्याकरता आज आपण आपल्या ह्या लेख मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आहोत .

Anxiety म्हणजे काय ?

साध्या आणि सरळ शब्दात सांगायचं झालं तर anxiety म्हणजे भीती वाटणे आणि अति चिंता करणे , anxiety हा कुठल्याही प्रकारचा आजार नाही ती फक्त एक मानसिक स्थिती आहे ती आपल्याला अनेक कारणांमुळे होऊ शकते आणि त्यामध्ये आपल्याला मानसिक आणि शारीरिक असे दोन प्रकारचे लक्षण दिसून येतात त्याला Anxiety Attack असं सुद्धा म्हणतात परंतु हा anxiety attack काही क्षणात ठीकही होऊन जातो आणि त्यामुळे शरीलाला कुठल्याही प्रकारचा अपाय होत नाही परंतु दिवसेंदिवस आपली anxiety जर वाढत असेल तर आपल्याला त्यावर उपाय करण अत्यंत गरजेचे आहे कारण त्या anxiety चं रूपांतर काही दिवसांनी Generalized Anxiety Disorder (GAD) या आजारामध्ये होऊ शकत आणि त्यामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकत

Anxiety का होते ?

स्पर्धेच्या या युगात आज प्रत्येकाला टिकून रहायचं आहे कोणाला नाव कमवायचा आहे तर कोणाला श्रीमंत व्हायचं आहे आणि हे करण्यासाठी अपार मेहनत आणि संघर्ष लागतो आणि जिथे संघर्ष आला तिथे विचार आले आणि जिथे विचार आले तिथे चिंता आली .चिंता करणं चुकीचं नाही परंतु अति चिंता करणं फार चुकीचं आहे . anxiety होण्याचे अनेक कारणं असतात उदारणार्थ , कोणा कोणाला Study anxiety असते , मला सरांनी आज खूप होमवर्क दिला तो पूर्ण होईल का ? नाही झाला तर सर मला रागावतील का ? , माझी कम्पलेंट करतील का ? अशी भीती अनेक विद्यार्थी आपल्या मनात रोज घेऊन फिरत असतात म्हणजेच त्यांना एक प्रकारची anxiety असते . Anxiety ही साधारण प्रत्येकाला असतेस परंतु त्याची कारणे वेगळे वेगळे असतात .कोणाला व्यवसाया संबंधी anxiety असते तर कोणाला आजारपणा संबंधी anxiety असते आणि या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे अती विचार करणे , आपल्या डोक्यामध्ये सतत विचारांचं चक्र चालू असलं की त्याचा थेट परिणाम हा मेंदूवर होतो आणि त्यामुळे आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास होऊ लागतो आणि त्यामध्ये अनेक प्रकारची लक्षणे दिसून येतात …

Anxiety होण्याचे प्रमुख कारणे कोणती ?

■ सतत अतिविचार करणे आणि चिंता करणे
■ अतिप्रमाणात गोळ्या औषधीच सेवन करणे
■ व्यसनाधीन होणे
■ मनात नेहमी भीती असणे
■ पुरेशी झोप न घेणे
■ पौष्टिक अन्नचा अभाव
■ पारिवारिक समस्या
■ आर्थिक समस्या
■ ऑफिसमधील कामाचा भार
■ आजारपण

Anxiety चं निदान कसं करायचं ?

Anxiety चं निदान करण्यासाठी कुठलीही मेडिकल टेस्ट करणं गरजेचं नसतं , आपल्यामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणामधून आपण ते ओळखू शकतो परंतु लक्षणांची तीव्रता अधिक असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे

Anxiety ची प्रमुख लक्षणे कोणती ?

Anxiety ची अनेक प्रकारची लक्षणे असतात त्यामध्ये मानसिक लक्षणे आणि शारिरीक लक्षणे असतात , anxiety मध्ये प्रत्येकाला वेगवेगळी लक्षण दिसून येतात .

मानसिक लक्षणे
● कामामध्ये चित्त न लागणे
● डोक्यामध्ये विचार चक्र चालू असणे
● चीड चीड पणा करणे
● भीती वाटणे , इ

शारीरिक लक्षणे
● हृदयाची धड धड वाढणे
● श्वासाची गती वाढणे
● थंडा घाम येणे
● डोळे जड पडणे
● पोटासबंधी समस्या
● मांसपेशीमध्ये तणाव वाढणे
● अंगाचा थरकाप होणे
● तोंड कोरडे पडणे. इ

Anxiety मूळे होणारे दुष्परिणाम ?

Anxiety मुळे होणारा एक सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे आणि तो म्हणजे , anxiety मुळे आपलं रोजचं जीवन विस्कळीत होतं , आपलं कोणत्याच कामात चित्त लागत नाही , चिडचिड होते , आत्मविश्वास कमी होतो आणि आपण एकटं राहायला लागतो .

Anxiety बरी कशी होईल त्यावर उपाय काय ?

Anxiety बरी करण्यासाठी बाजारात खूप प्रकारची औषधं उपलब्ध आहेत परंतु anxiety वर एक असं औषध आहे जे खूप कामी येतं आणि ते औषध म्हणजे रोज सकाळी मेडिटेशन करणे , आपण जर बघितलं तर anxiety ही अती विचार करण्यामुळे निर्माण होते आणि ज्या वेळेस आपण आपल्या डोक्यात चालणाऱ्या विचारचक्रावर नियंत्रण मिळवू त्यावेळस आपली anxiety आपोआप कमी होईल आणि त्यासाठी आपल्याला दररोज मेडिटेशन आणि योगा करणं फार गरजेचं आहे , आणि आपल्या डोक्यात नेहमी सकारात्मक विचाराचं येतील हा आपला प्रयत्न असला पाहिजे , त्यानंतर आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या भाजीपाल्याचा वापर असला पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टींची जास्त आवड आहे त्या गोष्टींमध्ये आपण जास्तीत जास्त व्यस्त असलं पहिजे उदारणार्थ वाचणे , लिहणे, गाणी ऐकणे इ .

Anxiety कडे दुर्लक्ष करू नका :

● आपल्या Anxiety कडे अजिबात दुर्लक्ष करू नका .
● आपल्या Anxiety विषयी आपल्या घरातल्या व्यक्तींशी चर्चा करा .
● वरील लक्षणे प्रत्येक वेळेस Anxiety ची चं असू शकता असं नाही , त्या लक्षणांची तीव्रता वाढल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या .
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषध बाजारातून आणून त्यांचं सेवन करू नका .

टीप : वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे , तुम्हाला anxiety विषयी काहीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अति आवश्यक आहे .

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *