ऍसिडिटी चे कारणे , लक्षणे आणि घरगुती उपाय | Acidity : Symptoms and Cause
ऍसिडिटी :
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण बघतोच की जवळपास दहा पैकी आठ लोकांना ऍसिडिटीचा त्रास हा असतोच आणि त्यामुळे आपल्याला अनेक समस्या सुद्धा उद्भवतात . आणि त्यामुळे आपण डॉक्टरांचा सल्लाही घेतो आणि काही घरगुती उपायही करतो जेणे करून आपल्याला ऍसिडिटी पासून आराम मिळेल .
परंतु तुम्हाला माहितीय का की ऍसिडिटी का होते आणि त्यांचे लक्षणे आणि घरगुती उपाय काय आहेत ते , तर आपण आपल्या ह्या लेखामध्ये सविस्तर तेच बघणार आहोत .
ऍसिडिटी होण्याची काही प्रमुख कारणे :
● पोटातील हैड्रोक्लोरीक ऍसिड कमी जास्त होणे
● जास्त वेळ उपाशी राहणे
● तेलकट , तिखट , मसालेदार , खारट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते
● चहा-कॉफी , कोल्ड्रिंक्स , तसेच धूम्रपान आणि मद्यपणामुळे ऍसिडिटी होते
● ताण-तणाव , रात्री जास्तवेळ जागरण करणे यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते
● दुखण्याच्या गोळ्या औषधींमुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते
● अवेळी जेवण व जेवणाची वेळ निश्चित नसल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होते .
ऍसिडिटी झाल्याची लक्षणे कोणती ?
● घश्यामध्ये जळजळ व आंबट ढेकर येणे
● छातीमध्ये जळजळ होणे
● मळमळ होणे , तोंडामध्ये आंबट पाणी येणे
● डोकेदुखी आणि पोटात जळजळ होणे
ऍसिडिटी वर घरगुती उपाय कोणते ?
थंड दूध घ्या –
ऍसिडिटी झाल्यास त्वरित आराम हवा असेल तर थंड दूध जरूर घ्या त्यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास त्वरित मदत होते .
बडीशोप खावी –
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की जेवणानंतर बडीशोप खाणे फार लाभदायी आहे , कारण त्यामुळे पोटातील गॅस कमी होण्यास मदत होते आणि अन्नपचन सुद्धा होते
केळी खावीत –
केळी खाल्यामुळे सुद्धा ऍसिडिटी कमी होण्यास फार मदत होते
ताक घ्या –
ताक पिल्यामुळे पोटात थंडावा निर्माण होतो आणि त्यामुळे ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते
अद्रक चावून खा –
अद्रक चावून खाल्यामुळे काही प्रमाणात ऍसिडिटी ही कमी होते आणि अन्नपचन सुद्धा व्यवस्थित
ऍसिडिटी होऊ नये या साठी काय करावे :
● ताण-तणाव कमी करावा , आणि व्यायाम आणि योगा करावा
● जास्तवेळ पोट रिकामे ठेवू नये , सकाळी नाश्ता लवकर करावा
● अतिप्रमाणात तिखट , खारट , मसालेदार पदार्थ खाऊ नये
● चहा-कॉफी , कोल्ड्रिंक्स , धूम्रपान , मद्यपान जास्तीत जास्त टाळावे
● जेवणाची वेळ निश्चित करून घ्यावी , अवेळी जेवण करू नये
● भरपूर प्रमाणात पाणी प्यावे आणि जेवतांना ताक पिणे
● तेलकट पदार्थ आणि पॅकिंग फूड कमी खावीत
● दुखण्याच्या गोळ्या कमी घ्याव्यात
● जेवल्यानंतर त्वरित पाणी पिऊ नये
टीप- तुम्हाला सततची ऍसिडिटी असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या