बदाम खाण्याचे फायदे | Health Benefits of Almonds

बदाम – Almond

बदाम आपल्यासाठी काही नवीन नाही ते सगळ्यांना माहीतच आहे अगदी लहानमुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत बदाम सगळ्यांनाच आवडतात आणि अनेकांना बदामाचे गुणकारी फायदे सुद्धा माहीत आहेत.बदामामध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत.

बदाम खाणे हे हृदयासाठी , मेंदूसाठी , त्वचेसाठी आणि अनेक अश्या शारीरिक समस्यांवर खूप गुणकारी आहे.बदामामुळे रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे बदाम हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास सुद्धा मदत करते

बदाम हे अनेक प्रकारे खाता येते परंतु भिजवलेले बदाम खाणे हे फार गुणकारी ठरते त्याचप्रमाणे बदाम घालून केलेले पदार्थही आपण खाऊ शकतो जसे बदामाचे दूध , बदामाचा हलवा , बदामाची बर्फी आणि आलमंड बटर इ.

बदाम मध्ये असणारे पोषकतत्वे –

बदामामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे पोषकतत्वे असतात जे आपल्या शरीराचं पोषण करण्यास फायदेशीर ठरतात त्यापैकी काही पोषकतत्वे आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.

● कॅलरीज (Calories)
● फॅट (Far)
● प्रोटीन (Protein)
● फायबर (Fibar)
● कार्बोहायड्रेट (Carbohydrates)
● लोह (Iron)
● कॉपर (Copper)
● झिंक (Zinc)
● कॅल्शियम (Calcium)
● मॅग्नेशियम (Magnesium)
● पोटॅशियम (Potassium)
● फॉस्फरस (Phosphorus)
● मॅगनिज (Manganese)
● फोलेट (Folate)
● व्हिटॅमिन बी6 (Vitamin B6)
● व्हिटॅमिन इ (Vitamin E)

हे सुद्धा वाचा- जाणून घ्या बाजरी खाण्याचे फायदे

बदाम खाण्याचे फायदे –

बदाम खाल्यामुळे शरीराला खूप फायदे पोहचतात त्याचप्रमाणे बदाम हे अनेक शारीरिक समस्यांवर गुणकारी ठरतात ते आपण खाली सविस्तर बघणार आहोत.

● वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत- बदामाचे नियमित सेवन केल्याने ते वजन आटोक्यात ठेवण्यास फायदेशीर ठरते कारण बदामामध्ये कमी कार्बोहायड्रेट आणि भरपूर प्रमाणात फायबर , प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात.त्याकरता नियमित बदामाचे सेवन केले पाहिजे.

● हाडे मजबूत करण्यास गुणकारी- बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम , पोटॅशियम , मॅग्नेशियम , कॉपर , झिंक , प्रोटीन , व्हिटॅमिन्स असल्यामुळे ते हाडे मजबूत करण्यास फार गुणकारी ठरतात त्यामुळे ज्यांची हाडे ठिसूळ आहेत त्यांनी नियमित बदामाचे सेवन केले पाहिजे.

● मेंदूची कार्यक्षमता वाढवते- बदामामध्ये असे अनेक पोषकतत्वे आहेत जे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास फार उपयोगी ठरतात.बदामाच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे लहान मुलांसाठी बदाम हे खूप लाभदायी आहेत.

● रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते- बदाम खाणे हे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये खूप लाभदायी मानले जाते कारण बदामामध्ये भरपूर प्रमाणात फायबर , प्रोटीन , मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात आणि त्यामुळे रक्तातील साखर ही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

● रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते- बदामाचे नियमित सेवन केल्याने रक्तातील वाईट ( LDL ) कोलेस्टेरॉल कमी होते त्याचबरोबर चांगले ( HDL) कोलेस्टेरॉल सुद्धा वाढण्यास मदत होते.

● हृद्यविकारांपासून संरक्षण होते- बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन , फायबर , मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असल्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत त्यामुळे ब्लडप्रेशर सुद्धा नियंत्रणात राहते आणि हृद्यविकारांचा धोका सुद्धा कमी होतो.

● त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत- बदामाचे नियमित सेवन केल्याने त्वचा ही निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते कारण बदामामध्ये त्वचेसाठी फायदेशीर असे व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स असतात.

● रक्त वाढीसाठी उपयुक्त- नियमित बदाम खाणे हे हिमोग्लोबीन वाढीसाठी खूप फायदेशीर मानले जाते कारण बदाम मध्ये लोहाचे प्रमाण असते त्याकरता हिमोग्लोबिन कमी असल्यास बदाम खाणे उपयुक्त ठरते.

● कॅन्सरचा धोका कमी करते- बदामामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असल्यामुळे ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते त्याचबरोबर कॅन्सरचा धोका सुद्धा कमी होण्यास मदत होते.

● रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत- बदमामध्ये अनेक प्रकारचे महत्वाचे घटक आहेत जे शरीरासाठी खुप पोषक आहेत ज्यामुळे बदामाच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते.

बदामाचे कसे खावेत ?

दररोज आपण चार ते आठ बदाम खाऊ शकतो त्यापेक्षा अधिक बदाम खाल्यास ते पोटासाठी त्रासदायक ठरू शकते.

बदाम आपण कसेही खाऊ शकतो म्हणजेच कच्चे बदाम , रोस्ट केलेले बदाम , बदामाचा हलवा , आलमंड बटर , बदामाचे दूध इ .परंतू भिजवलेले बदाम खाल्याने ते अधिक फायदेशीर ठरते .
त्याकरता बदाम हे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे त्यानंतर सकाळी त्या बदामाची वरील साल काढून ते खावेत.भिजवलेले बदाम खाल्याने ते शरीरासाठी फार पोषक ठरतात आणि पचण्यास सुद्धा सोपे असतात.

हे सुद्धा वाचा- नारळ पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मधुमेह असलेल्यांनी बदाम कसे खावेत ?

ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी कच्चे किंवा भिजवलेले बदाम खाल्यास ते गुणकारी ठरतात परंतु बदाम घालून केलेले गोड पदार्थ हे त्रासदायक ठरू शकतात.त्याकरता ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी बदामाचे गोड पदार्थ खाणे टाळावेत.

गरोदरपणात बदाम खावेत का ?

हो , गरोदरपणात बदाम खाणे हे फायदेशीर ठरते कारण बदामामध्ये अनेक पोषकतत्वे असतात आणि फोलेट सुद्धा असते जे गर्भवती महिलांसाठी खूप उपयुक्त मानले जाते त्याकरता गर्भवती महिलांनी नियमित बदाम खावेत पण बदाम खाण्याआधी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

लहान मुलांमध्ये बदामाचे फायदे-

लहान मुलांना बदाम खाण्यास दिल्यास त्यांच्या शरीराचे चांगले पोषण होते व त्यांचं शरीर निरोगी राहण्यास मदत होते त्याचबरोबर बदामामुळे त्यांची चांगल्याप्रकारे स्मरशक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते.

लहान मुलांना बदाम खाण्यास देतांना ही काळजी घ्यावी-

● लहान मुलांना दररोज तीन ते चार बदाम आपण देऊ शकतो त्यापेक्षा अधिक बदाम दिल्यास त्यांना ते त्रासदायक ठरू शकते.
● लहान मुलांना बदाम देतांना त्या बदामाचे तुकडे करून द्यावेत जेणेकरून बदाम त्यांच्या घश्यात किंवा छातीत अडकणार नाहीत.
● लहान मुलांना बदामाची पावडर करून आपण दुधात सुद्धा देऊ शकतो.

बदामामुळे होणारे दुष्परिणाम –

बदाम हे अतिप्रमाणात खाल्यास खालीलपैकी त्रास होऊ शकतो
● पोटदुखी
● अतिसार
● बद्धकोष्ठता
● गॅसेस होणे

हे सुद्धा वाचा- जाणून घ्या बिट खाण्याचे गुणकारी फायदे

टीप-वरील बदामाविषयी माहिती ही सामान्य माहितीसाठी आहे बदामाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *