बाजरी खाण्याचे फायदे | Bajara Health Benefits in Marathi

आपल्याला माहीतच आहे की सगळ्या प्रकारचे धान्य खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहे कारण सगळ्या प्रकारच्या धान्यामध्ये खूप सारे पोषकतत्वे असतात आणि ते पोषकतत्वे आपलं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

वेगवेगळ्या धान्यांचे वेगवेगळे लाभदायी फायदे आहेत त्यात सगळ्या धान्यांमध्ये बाजरी ही खूप गुणकारी मानली जाते कारण बाजरीमध्ये अनेक प्रकारचे महत्त्वाचे पोषक तत्वे आहेत.बाजरी खाल्याने आपलं हृदय , पोट , हाडे , त्वचा निरोगी राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे बाजरीचे अनेक शारीरिक समस्यांमध्ये गुणकारी फायदे आहेत जे आपण खाली सविस्तर बघणार आहोत.

बाजरीमध्ये असणारे महत्वाचे घटक कोणते ?

बाजरीमध्ये खूप सारे महत्वाचे घटक आहेत जे आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.त्यातील काही पोषक घटक खालील प्रमाणे आहेत.

● कॅलरीज (Calories)
● फॅट (Fat)
● प्रोटीन (Protein)
● कार्बोहायड्रेट (Carbohydrates)
● फायबर (Fibar)
● आयर्न (Iron)
● फोलेट (Folate)
● झिंक (Zinc)
● सोडियम (Sodium)
● मॅग्नेशिअम (Magnesium)
● फॉस्फरस (Phosphorus)
● व्हिटॅमिन बी 1(Vitamin B1)
● व्हिटॅमिन बी 2 (Vitamin B2)
● व्हिटॅमिन बी 3 (Vitamin B3)
● व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6)

बाजरी खाण्याचे फायदे-Health Benefits of Bajara

बाजरी खाणे आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे कारण बाजरीमुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते.

● शारिरीक पोषण करण्यास फायदेशीर : बाजरीमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्वे आहेत जे संपूर्ण शरीराचं पोषण करण्यास फायदेशीर ठरतं त्यामुळे आठवड्यातून निदान दोन ते तीन दिवस बाजरीचे सेवन केले पाहिजे.

● रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते : बाजरीचे सेवन केल्याने रक्तातील साखर ही नियंत्रणात राहते कारण त्यामध्ये भरपूर फायबर आणि इतर पोषकतत्वे असतात म्हणून बाजरी खाणे मधुमेह असणाऱ्यांसाठी उपयुक्त मानली जाते.

● हृदय निरोगी ठेवण्यास मदत : बाजरी खाणे हृदयासाठी खूप गुणकारी मानली जाते कारण बाजरी मध्ये फायबर , मॅग्नेशिअम ,आणि अनेक व्हिटॅमिन्स असल्यामुळे ते आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

● कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते : बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते त्यामुळे हृदय विकारांपासून सुद्धा संरक्षण होते.

● वजन कमी करण्यास मदत : बाजरीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असल्यामुळे बाजरी खाणे हे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते त्यामुळे बाजरीच्या सेवनाने वजन सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

● त्वचा निरोगी ठेवण्यास मदत : बाजरीमध्ये अनेक पोषकतत्वे आणि व्हिटॅमिन्स असल्यामुळे ते त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते त्याचप्रमाणे बाजरीच्या सेवनाने नखे आणि केस सुद्धा निरोगी राहतात.

● हाडे मजबूत करण्यास मदत : बाजरीमध्ये अनेक पोषकतत्वे असे आहेत जे हाडे मजबूत करण्यास सुद्धा फार उपयुक्त ठरतात तसेच बाजरीच्या सेवनाने संधीवातामध्ये आराम मिळतो.

● सर्दी , खोकल्यामध्ये गुणकारी : लहानपणी आपल्याला सर्दी , खोकला झाला की आपली आई किंवा आजी आपल्याला गरमा गरम बाजरीचा घाटा प्यायला द्यायची कारण त्यामुळे आपल्याला लगेच आराम मिळायचा.

● पचनक्रिया सुधारण्यास मदत : बाजरीमध्ये फायबर असल्या कारणाने ती पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त ठरते त्यामुळे बाजरी खाणे हे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत त्याचप्रमाणे बाजरी ही पोट साफ करण्यास सुद्धा उपयुक्त मानली जाते.

● हिवाळ्यामध्ये बाजरी खाणे गुणकारी : हिवाळ्यात बाजरी खाणे हे फार उपयुक्त मानले जाते कारण हिवाळ्यात बाजरीच्या सेवनाने शरीर उष्ण राहण्यास मदत होते.

● आईचे दूध वाढण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते : नवीन बाळंतीण आईला दररोज बाजरीच्या पिठाचा गूळ घालून घाटा प्यायला दिला जातो त्याचं कारण म्हणजे बाजरीमुळे भरपूर प्रमाणात दूध वाढते.

हे सुद्धा वाचा : लिंबू खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बाजरी कशी खावी ?

बाजरी ही अनेक प्रकारे खाता येते बाजरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात जसे की बाजरीची भाकरी , बाजरीची पोळी , बाजरीची खिचडी किंवा गूळ घालून बाजरीचा घाटा.परंतु आपल्याकडे बाजरीची भाकरी ही जास्त प्रमाणात खाल्ली जाते. त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी ही हिरवा पालेभाजी सोबत खाल्यास ती अधिक फायदेशीर ठरते.

बाजरी कोणी खाऊ नये ?

तसं पाहिलं तर बाजरी खाणे हे शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे ती कोणीही खाऊ शकत परंतु ज्या व्यक्तींना थायरॉईड चा त्रास आहे त्यांनी अति प्रमाणात बाजरी खाऊ नये किंवा बाजरी खाणे टाळावे.

टीप-वरील माहिती ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला पोषक आहाराविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या डॉक्टरांना सल्ला जरूर घ्यावा.

हे सुद्धा वाचा : नारळ पाणी पिण्याचे लाभदायी फायदे

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *