अंगदुखीची कारणे आणि घरगुती उपाय | body pain in marathi

अंगदुखी – Body Pain

अंगदुखी हा कुठल्याही प्रकारचा आजार नाही ते एक शारीरिक लक्षण आहे.अंगदुखीचा त्रास हा जवळपास सगळ्यांनाच होतो अंगदुखी होण्याचे अनेक कारणे असतात जसे की अति श्रम , बैठे काम , व्यायामाचा अभाव , लांबचा प्रवास , संधिवात , सर्दी , ताप आणि अनेक आजारांमुळे सुद्धा अंगदुखीचा त्रास होतो.

अंगदुखी मध्ये कुठलेही औषध घेण्याची गरज पडत नाही केवळ काही वेळ आराम केल्याने अंगदुखी बरी होते.परंतु अंगदुखी जास्त प्रमाणात असल्यास त्यावर उपचार करणं गरजेचं असतं त्याकरता आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने काही पेनकिलर गोळ्या घेऊ शकतो किंवा काही घरगुती उपाय सुद्धा त्यावर कामी येतात.

अंगदुखी होण्याची कारणे कोणती – Body Pain Cause

अंगदुखी होण्याची अनेक कारणे असतात त्यापैकी खाली दिलेली काही कारणे अंगदुखीसाठी कारणीभूत ठरतात.

मानसिक तणाव
● सर्दी , ताप , फ्ल्यू
● लांबचा प्रवास
● अति प्रमाणात श्रम करणे
● संधीवात , आमवात
अपूर्ण झोप , अशक्तपणा
● वायरल इन्फेकशन
● किडनीचे विकार , लिव्हरचे विकार
● फायब्रोमायलजिया
● क्रोनिक फटीग सिन्ड्रोम
● शरीरातील कॅल्शियमची कमतरता
● शरीरातील पोटॅशिअमची कमतरता
● शरीरातील रक्ताची कमतरता
● शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता
शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता
● शरीरातील पाण्याची कमतरता
काही औषधींमुळे सुद्धा अंगदुखीची त्रास होऊ शकतो

अंगदुखीची लक्षणे –

अंगदुखी मध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात जसे की थकवा येणे , अशक्तपणा वाटणे ,पाठ दुखणे , कंबर दुखणे खांदे दुखणे , हात-पाय दुखणे , पोटऱ्या दुखणे , गुडघेदुखी ,
डोके दुखणे किंवा संपूर्ण शरीरात वेदना होणे

हे सुद्धा वाचाडोकेदुखी चे प्रकार आणि कारणे

अंगदुखी वर घरगुती उपाय – home remedies on body pain

■ अंगदुखीसाठी अनेक घरगुती उपाय आहेत परंतु त्यामध्ये हळद ही फार गुणकारी आहे हळदी मध्ये अँटी-इंफ्लामेंटरी गुणधर्म आहे जे वेदना कमी करण्यास उपयुक्त ठरते त्यासाठी अर्धा चमचा हळद कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळून प्यावी त्यामुळे अंग दुखी कमी होण्यास मदत होते.

■ दालचिनी ही सुद्धा अंगदुखी मध्ये फार गुणकारी मानली जाते दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लामेंटरी गुणधर्म असल्यामुळे ती वेदना कमी करण्यास उपयुक्त ठरते त्याकरता दालचिनीचे दोन ते तीन छोटे तुकडे एक ग्लास पाण्यात उकळून घ्यावी त्यामुळे अंगदुखी मध्ये चांगल्यापैकी आराम पडतो.

■ व्यायाम हा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते परंतु अति प्रमाणात व्यायाम केल्याने सुद्धा अंगदुखीचा त्रास होऊ शकतो पण तोच व्यायाम दररोज अर्धा तास केल्याने अंगदुखीपासून आराम मिळतो.

■ बऱ्याचवेळा अंगदुखी ही शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे म्हणजेच डीहायड्रेशन होते त्याकरता दररोज भरपूर प्रमाणात पाणी पिले गेले पाहिजे जेणेकरून अंगदुखी टाळता येईल.

■ अनेकवेळा अंगदुखीमध्ये घरगुती उपाय कामी येत नाही त्याकरता अंगदुखीचा त्रास हा अति प्रमाणात होत असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही औषधी घेऊ शकतात.

वारंवार होणाऱ्या अंगदुखीकडे दुर्लक्ष करू नये –

वारंवार होणारी तीव्र अंगदुखी ही सामान्य नसू शकते ती काही आजारांची लक्षणे सुद्धा असू शकते त्याकरता वारंवार जर तीव्र अंगदुखी होत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अंगदुखीमध्ये वारंवार स्वतःच्या मनाने पेनकिलरच्या गोळ्या घेणे योग्य आहे का ?

नाही , अंगदुखीमध्ये वारंवार पेनकिलरच्या स्वतःच्या मनाने गोळ्या घेणे हे घातक ठरू शकते त्यामुळे लिव्हर आणि किडनीला हानी पोहचू शकते त्याकरता अंगदुखी मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानेचं औषधी गोळ्या घेतल्या गेल्या पाहिजेत.

अंगदुखी न होण्यासाठी काय करावे –

● दररोज अर्धातास व्यायाम करणे
● हिरवा भाजीपाला खाणे
● दिवसभर भरपूर पाणी प्यावे
● मानसिक तणाव कमी करावा
● पुरेशी झोप घेणे
● लांबचा प्रवास कमी करावा
● अंगदुखी मध्ये विश्रांती करावी
● कॅल्शिअम साठी दूध पिणे
● सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात बसावे जेणेकरून व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून निघेल.

टीप-वरील माहिती ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

हे सुद्धा वाचा- उष्मघाताची कारणे,लक्षणे आणि घरगुती उपाय

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *