सामान्य सर्दी , कारणे आणि लक्षणे | Comman Cold

सामान्य सर्दीचे लक्षणे | Symptoms of Comman Cold –

सर्दीची समस्या ही लहाण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते आणि त्याला कारणीभूत ही अनेक कारणे असतात परंतु त्यामधले प्रमुख कारण म्हणजे बदलते हवामान आणि त्याच बदलत्या हवामानात असणारे अनेक प्रकारचे घातक व्हायरस , परंतु सर्दी ही प्रामुख्याने राहिनोव्हायरस (Rhinovirus) मुळे होते .

सर्दी झाल्यानंतर ती साधारण तीन ते दहा दिवसांपर्यंत राहू शकते आणि सर्दी बरोबरच अनेक लक्षणे सुद्धा दिसून येतात जसे की खोकला आणि ताप .

सामान्य सर्दी ही शरीरासाठी घातक नसते ती काही घरगुती उपचारांनी सुद्धा बरी होऊ शकते परंतु सर्दी जर तीन दिवसांपेक्षा अधिक असेल तर आपल्या डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे .

सर्दी होण्याची कारणे –

सर्दी ही अनेक कारणांमुळे होत असते त्यापैकी खालील काही प्रमुख कारणे आहेत.

● राहिनोव्हायरस ( Rhinoviruses)
● कमजोर रोगप्रतिकारक शक्ती
● थंड हवामान किंवा हिवाळा
● बदलते हवामान
● अति थंड पाणी पिणे
● थंडया पाण्याने अंघोळ करणे
● थंड पेय किंवा थंड पदार्थ खाणे
● धुळकण , हवेतील प्रदूषण
● सर्दी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे

सामान्य सर्दीची लक्षणे कोणती –

सामान्य सर्दीमध्ये अनेक प्रकारची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात त्यामध्ये खालीलपैकी काही लक्षणांचा समावेश आहे .

● नाकातून सतत पाणी येणे
● नाक लाल होणे आणि शिंका येणे
● नाक ब्लॉक होणे किंवा दुखणे
● घसा लाल होणे किंवा दुखणे
● खोकला येणे
● ताप येणे , डोके दुखणे
● कफ होणे किंवा छातीत खरखर होणे
● अंगदुखी होणे , अशक्तपणा येणे
● डोळ्यातून पाणी येणे
● थंडी वाजून येणे
● वास न येणे , जिभेची चव जाणे
● श्वास घेण्यास त्रास होणे

सर्दीसाठी घरगुती उपचार कोणते –

अनेकदा घरगुती उपचार हे सामान्य सर्दीसाठी लाभदायी ठरतात परंतू सर्दी ही जास्त दिवसापर्यंत असेल तर डॉक्टरांकडून उपचार घेणे फार गरजेचे आहे

● आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक काढा घेणे
● दिवसातून दोन वेळा वाफ घेणे , कोमट पाणी पिणे
● कोमट पाण्यात थोडे मीठ घालून दिवसातून तीन ते चार वेळा गुळण्या कराव्यात ( परंतु ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी पाण्यात मिठाचा वापर करणे टाळावे )
● तुळस आणि आलं टाकून चहा घ्यावा किंवा एक चमचा आल्याचा रस घ्यावा
● गरमागरम सूप पिणे किंवा बाजरीच्या पिठाचा घाटा पिणे
● सुंठ , वेखंड आणि जायफळ उगाळून ते गरम करून कपाळाला आणि नाकाला लावणे .
● व्हिटॅमिन सी (क) युक्त फळांचे सेवन करावे
● दिवसातून एक ते दोन वेळा लवंग चघळावा

(लहान मुलांमध्ये घरगूती उपचारांचा वापर टाळावा )

सर्दी झाल्यास काय काळजी घ्यावी –

● जास्तीत जास्त मास्क चा वापर करावा
● थंड हवेपासून दूर राहावे
● फ्रिज मधील थंड पाणी पिऊ नये
● थंडया पाण्याने अंघोळ करू नये
● थंड पेय किंवा पदार्थांचे सेवन टाळावे
● कोमट पाणी पिणे , वाफ घेणे
● शिंकतांना किंवा खोकलतांना तोंडावर रुमाल ठेवावा
● बाहेररून आल्यानंतर हात आणि चेहरा स्वच्छ धुवावा
● पुन्हा पुन्हा डोळ्यांना आणि नाकाला स्पर्श करू नये
● आपले हातरुमाल कडक पाण्यात स्वच्छ धुवावेत
● लहान मुलापासून काही दिवस दूर राहावे जेणेकरून आपले सर्दीचे संक्रमण त्यांना होणार नाही.
● परस्पर गोळ्या औषधी घेऊ नये

सर्दी होऊ नये यासाठी काय करावे –

● गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे
● अति थंड पदार्थ खाणे टाळावे
● धुळीपासून लांब राहावे किंवा तोंडाला रुमाल बांधावा
● हिवाळ्यामध्ये गरम कपड्यांचा वापर करावा व कान झाकलेले असावे
● सर्दी संक्रमित व्यक्तींपासून काही दिवस लांब रहावे

डॉक्टरांना केव्हा भेटावे –

● सर्दी जर पाच दिवसांपेक्षा अधिक असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
● सर्दी बरोबर नाकातून रक्त येत असेल तर डॉक्टरांना त्वरित भेटावे
● सर्दी सोबत छातीमध्ये भरपूर कफ असेल तर डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे .

विषेश काय काळजी घ्यावी –

● गर्भवती महिलांना सर्दी झाल्यास त्यांच्यावर घरगुती उपचार करणे टाळावे
● लहान मुलांमध्येसुद्धा घरगुती उपचारांचा वापर करू नये
● डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल वरून परस्पर सर्दीसाठी औषधी घेऊ नये त्याकरिता अगोदर डॉक्टरांना दाखवावे

टीप – वरील माहिती ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे आम्ही कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देत नाही किंवा उपचार सुचवत नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *