दालचिनीचे फायदे आणि तोटे | dalchini uses

आपल्याला माहीतच आहे की हजारो वर्षांपासून आयुर्वेदीक औषधींचा वापर हा अनेक प्रकारच्या आजारांमध्ये केला जातोय आणि त्यामुळे अनेकांना आयुर्वेदिक औषधींचे विविध आजारांमध्ये खुप लाभदायी फायदे मिळाले आहेत.तर मंडळी आज आपण आपल्या ह्या लेख मध्ये आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असणारी एक आयुर्वेदिक औषधी बघणार आहोत आणि ती आयुर्वेदिक औषधी म्हणजे दालचिनी तिला इंग्रजीमध्ये सीन्नामोन ( Cinnamon ) असे म्हणतात.

दालचिनीचा वापर हा आपल्या घरामध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो परंतु दालचिनीमध्ये अनेक असे औषधीय गुण आहेत .दालचिनी ही अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांमध्ये वापरली जाते.दालचिनी ही चवीला तिखट , गोड आणि थोडी तुरट असते आणि ती बाजारामध्ये अगदी सहज मिळून जाते.

दालचिनीमध्ये असणारे महत्वाचे घटक :

कॅलरीज ( Calories )
आयरण ( Iron )
कॅल्शियम ( Calcium )
कार्बोहायड्रेट ( Carbohydrates )
व्हिटॅमिन अ ( Vitamin A )
फॉस्फरस ( Phosphorus )
पोटॅशिअम ( Potassium )
मॅग्नेशिअम ( Magnesium )

दालचिनीचे लाभदायी फायदे – Health Benefits of Cinnamon

  • दालचिनीमध्ये अनेक औषधीय गुण आहेत आणि दालचिनीचे अनेक शारीरिक समस्यांमध्ये खूप गुणकारी फायदे आहेत .ते सर्व फायदे आपण खाली सविस्तर बघणार आहोत.
  • दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लामेंटरी गुणधर्म असल्यामुळे ते शरीरातील दुखणे कमी करण्यास उपयुक्त ठरते त्यांच प्रमाणे शरीरातील सूज सुद्धा कमी करते
  • एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि थोडस मध एकत्र करून घेतल्यास उलटी आणि जुलाब थांबण्यास उपयोगी ठरते
  • दररोज अर्धा ग्लास कोमट पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर मिक्स करून पिल्यास वजन कमी होण्यास मदत होते व वजन नियंत्रणात सुद्धा राहते
  • दालचिनी ही डोकेदुखीमध्ये फार गुणकारी मानली जाते त्याकरता दालचिनी पावडरमध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करावी आणि ती कपाळाला लावल्यास डोकेदुखी थांबते
  • दालचिनीचे तेल किडलेल्या दातांच्या आजूबाजूला लावल्यास त्याठिकाणी असणारे जंतू मरतात आणि त्यामुळे दातदुखी पासून सुद्धा आराम मिळतो
  • पोटातील गॅसेस आणि पोटदुखी मध्ये दालचिनी पावडर मधामध्ये चाटून खाल्यास पोटदुखी आणि पोटातील गॅसेस कमी होण्यास मदत होते
  • दालचिनीमध्ये अँटी-वायरल गुणधर्मअसल्यामुळे ते सर्दी , खोकला आणि इतर अन्य वायरल इन्फेक्शनमध्ये गुणकारी मानले जाते
  • दालचिनी ही हृद्यविकारांपासून संरक्षण करते तसेच रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल सुद्धा कमी करण्यास मदतगार ठरते
  • अनेक संशोधनानुसार दालचिनी ही अनेक प्रकारच्या कॅन्सरपासून संरक्षण करते किंवा कॅन्सर होण्याचा धोका कमी करण्यास उपयुक्त ठरते
  • दालचिनीचा अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल म्हणून सुद्धा वापर होतो त्यामुळे दालचिनी ही त्वचेचे आरोग्य राखण्यास उपयुक्त ठरते
येथे क्लीक करून वाचा-लसूण खाण्याचे फायदे

दालचिनीचे सेवन कसे करायचे ?

दालचिनी ही वेगवेगळ्या प्रकारामध्ये घेता येते त्याकरता तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने दालचिनीचे सेवन करू शकता

● दालचिनीचे दोन ते तीन छोटे छोटे तुकडे तुम्ही चहा मध्ये उकळून ती चहा घेऊ शकता
● दालचिनी पावडर कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊ शकता
● दालचिनीचा एक तुकडा चघळू शकता
● दालचिनी पावडर मध्ये मध मिक्स करून ते घेऊ शकता
( परंतु मधुमेह असणाऱ्यांनी मधाचा वापर करू नये )
● दालचिनी , अद्रक , तुळशीचे पाने ,लवंग याचा तुम्ही काढा करून घेऊ शकता
● बाजारात दालचिनीचे तेल सुद्धा उपलब्ध असते परंतु त्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा
● दालचिनीचा वापर करतांना एक वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .

मधुमेहाच्या रुग्णांनी दालचिनीचे सेवन करावे का ?

दालचिनीच्या सेवनाने रक्तातील साखर ही कमी होण्यास मदत होते . परंतु तुम्हाला जर मधुमेहाची समस्या असेल तर दालचिनीचे सेवन करण्याअगोदर एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .

दालचिनीमुळे होणारे दुष्परिणाम कोणते ?

आपल्याला माहीतचं आहे ज्या गोष्टीचे काही लाभ असतात तसे त्यांचे काही दुष्परिणामही असतात.तसेच दालचिनीच्या अति सेवनाने खालील पैकी काही दुष्परिणामही होऊ शकतात.

● दालचिनीचे अति सेवन केल्यास तोंडामध्ये किंवा घश्याला
छाले पडू शकतात
● दालचिनीमुळे लिव्हरला हानी पोहचू शकते
● मधुमेहाच्या रुग्णांनी दालचिनीचे सेवन अतिप्रमाणात करू नये त्यामुळे रक्तातील साखर जास्त कमी होऊन तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकते

दालचिनीचे सेवन करणे कोणी टाळावे ?

● गर्भवती महिलांनी दालचिनीचे सेवन करू नये किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
● लहान मुलांना दालचिनी देऊ नये त्यामुळे त्यांना इतर शारीरिक समस्या उद्भवू शकतात
● मधुमेह रुग्णांनी कमी प्रमाणात दालचिनीचे सेवन करावे
● तुम्हाला इतर कोणत्याही औषधी चालू असतील तर दालचिनीचे सेवन करू नये किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

टीप- वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

येथे जाणून घ्या लवंग खाण्याचे फायदे

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *