दुधी भोपळा खाण्याचे लाभदायी फायदे | Health Benefits of Bottle Gourd ( Lauki )
दुधी भोपळा / Lauki / Bottle gourd खाण्याचे लाभदायी फायदे :
दुधी भोपळा एक प्रकारची फळभाजी आहे , ती बाजारात अगदी सहज आणि स्वस्त मिळून जाते . दुधी भोपळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे पोषक तत्वे असतात . त्यामुळे शरीराला अनेक लाभदायी फायदे मिळतात . अनेक लोक दुधीचा ज्यूस घेतात तर काही लोक दुधीची भाजी आणि दशम्या खातात . दुधी भोपळा हा अनेक शारीरिक समस्यांवर गुणकारी ठरतो.
दुधीभोपळ्याला हिंदीमध्ये लौकि असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये Bottle Gourd असे म्हणतात . दुधी भोपळ्यामध्ये 95 % पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे दुधी भोपळा हा उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी खूप लाभदायी ठरतो
दुधी भोपळ्यामध्ये असणारे महत्वाचे घटक कोणते ?
● पाणी ( Water )
● प्रोटीन ( Protein )
● कार्बोहायड्रेट ( Carbohydrates )
● फायबर ( Fibar )
● कॅल्शिअम ( Calcium )
● आयर्न ( Iron )
● मॅग्नेशियम ( Magnesium )
● फॉस्फरस ( Phosphorus )
● पोटॅशिअम ( Potassium )
● सोडियम ( Sodium )
● झिंक ( Zinc )
● व्हिटॅमिन सी ( Vitamin C )
● व्हिटॅमिन बी1 ( Vitamin B1 )
● व्हिटॅमिन बी2 ( Vitamin B2 )
● व्हिटॅमिन बी3 ( Vitamin B3 )
● व्हिटॅमिन बी6 ( Vitamin B6 )
● व्हिटॅमिन बी9 ( Vitamin B9 )
दुधी भोपळा खाण्याचे फायदे कोणते ?
आयुर्वेदानुसार दुधी भोपळा हा निरोगी शरीर ठेवण्यास फार गुणकारी आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या शारिरीक समस्या ह्या दूर होण्यास मदत होते.
● शरीर थंड ठेवण्यास उपयुक्त
दुधी भोपळ्यामध्ये जवळपास 95 % पाणी असल्यामुळे तो शरीर थंड ठेवण्यास फार उपयुक्त ठरतो . उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचा दररोज एक कप ज्यूस घेतल्याने उष्माघातापासून संरक्षण होते.
● पाचनक्रिया सुधारते
दुधी भोपळ्यामध्ये डायटरी फायबरचे प्रमाण असल्यामुळे ते पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात त्याचप्रमाणे दुधी भोपळ्यामूळे बद्धकोष्ठतामध्ये सुद्धा आराम मिळतो.
● हृदय निरोगी ठेवण्यास लाभदायी
दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशिअम आणि फायबर असल्यामुळे ते हृदयासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे हृदय विकार दूर राहण्यास बऱ्यापैकी मदत होते.
● वजन कमी होण्यास मदत होते
दुधी भोपळ्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज आणि चांगल्या प्रमाणात फायबर असल्यामुळे अन्नाची गरज कमी भासते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते तसेच वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते.
● कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते
दुधी भोपळ्याच्या सेवनाने कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते त्याच प्रमाणे दुधी भोपळ्यामध्ये पोटॅशिअम असल्यामुळे रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहण्यास फार मदत होते.
● रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते
दुधी भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सुध्दा खूप लाभदायी ठरते त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सी हे अनेक शारीरिक समस्यांमध्ये गुणकारी ठरते.
● त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते
दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक दुसरे महत्वपुर्ण व्हिटॅमिन असल्याने ते त्वचा निरोगी ठेण्यास सुद्धा मदत करतात.
● मधुमेह नियंत्रणात राहतो
दुधी भोपळ्याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि त्यामुळे मधुमेहापासून होणाऱ्या इतर शारीरिक समस्यांपासून सुद्धा मदत होते.
दुधी भोपळ्याचे सेवन कसे करायचे ?
दुधी भोपळ्याचे सेवन हे अनेक प्रकारे केले जाते , तुम्ही एक कप दुधी भोपळ्याचा ज्यूस घेऊ शकतात त्याच प्रमाणे दुधी भोपळ्याची भाजी आणि दशम्या सुद्धा खाऊ शकतात.
दुधी भोपळा खातांना ही काळजी घ्यावी :
● दुधी भोपळा ताजा असावा जास्त दिवसांचा भोपळा खाऊ नये
● दुधी भोपळा कडू असल्यास तो खाऊ नये
● दुधी भोपळा खातांना एक वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा
दुधी भोपळा खाण्याचे दुष्परिणाम कोणते ?
ज्या प्रमाणे काही औषधींचा किंवा औषधीय गोष्टींचा फायदा असतो तसे त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा असतात. त्याच प्रमाणे दुधी भोपळ्याचे जसे फायदे आहेत तसे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत .दररोज दुधी भोपळ्याच्या अति सेवनाने काही दुष्परिणाम होऊ शकतात जसे की…..
● कडू दुधी भोपळा गरोदरपणात खाल्यास तो शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो
● दुधी भोपळ्यामुळे पोट दुखू शकते व पोटाचा इतर त्रास होऊ शकतो
● दुधी भोपळा कडू असल्यास उलटी जुलाब सारखा त्रास होऊ शकतो
● दुधी भोपळ्याच्या अति सेवनाने रक्तातील साखर अति प्रमाणात कमी होण्याचा धोका उद्भवू शकतो
● दुधी भोपळ्याच्या अति सेवनाने विषबाधा होण्याची शक्यता असते
टीप-वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .
One Comment