लसूण खाण्याचे फायदे | benefits of Garlic
लसूण :
वर्षानुवर्षे लसूण हा आपल्या घरात वापरला जातोय , पण कशासाठी ? तर आपले जेवणाचे पदार्थ अधिक स्वादिष्ट व्हावेत म्हणून आणि त्यातल्या त्यात लसूण ची चटणी ही तर जवळपास प्रत्येकाच्या घरात नेहमी असतेच परंतु लसूण मध्ये कीती औषधीय गुण आहेत हे आपल्याला माहीत आहे का ? तर फार कमी लोकं असतील की ज्यांना लसूण मधले औषधीय गुण माहीती असतील . परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा आपला आजचा खास लेख तर आज आपण आपल्या लेखामध्ये
लसूण खाण्याचे लाभदायी फायदे बघणार आहोत .
लसूणमधील काही महत्वाचे घटक :
प्रोटीन , फायबर , कार्बोहायड्रेट , अलिसीन , कॅलशीयम , आयर्न , मॅग्नेशिअम , सोडियम , झिंक , कॉपर , मॅग्नेस पोटॅशिअम ,फॉस्फरस ,व्हिटॅमिन सी , व्हिटॅमिन बी6 , व्हिटॅमिन अ , इ .
1) लसूणच्या सेवनामुळे उpच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते | Control High Blood Pressure
आपल्याला माहीतच आहे की उच्च रक्तदाब ( high blood pressure ) हे आपल्या शरीरासाठी फार घातक आहे , आणि उच्च रक्तदाबाममूळे आपल्याला गंभीर अश्या समस्या उद्भवू शकतात जसे की हृदयविकार , किडनी विकार आणि डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो
त्याकरता आपला रक्तदाब ( Blood pressure ) हे नेहमी नियंत्रणात असले पाहिजे आणि त्यावर घरगुती उपाय म्हणजे लसूण सकाळी लसूण च्या दोन कच्या पाकळ्या चावून खाल्याने किंवा अर्क घेतल्याने रक्तदाब हा नियंत्रणात राहण्यास मदत होते
2) लसून कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते
आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात एक म्हणजे LDL जे वाईट कोलेस्टेरॉल असते आणि एक असते HDL जे चांगले कोलेस्टेरॉल असते , LDL कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढल्यास आपल्याला हृदयासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात तसेच हार्ट अटॅक ( Heart Atack ) सुद्धा येऊ शकतो त्याकरता आपल्या शरीरातील LDL आणि HDL ह्या दोन्ही कोलेस्टेरॉल चं प्रमाण नियंत्रणात असलं पाहिजे .
त्यासाठी लसूण हा फार उपयोगी मानला जातो , दररोज सकाळी लसूण च्या दोन ते तीन पाकळ्या चावून खाल्यास ( LDL ) वाईट कोलेस्टेरॉल च प्रमाण कमी होतं आणि ( HDL ) चांगल्या कोलेस्टेरॉल च प्रमाण वाढण्यास सुद्धा मदत होते
3 ) लसूण खाल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते
मधुमेहाची समस्या ही फार गंभीर आहे मधुमेह हा शरीरामध्ये अनेक समस्या निर्माण करत असतो त्यामुळे मधुमेह हा नियंत्रणात असणं फार गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कोणतीही शारीरिक समस्या उदभवणार नाही
लसूण मध्ये सल्फर कंपाउंड असल्यामुळे ते इन्सुलिन रजिस्टन्स ( insulin Resistance ) कमी करून मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होते त्याकरता मधुमेहामध्ये लसूण हा गुणकारी मानला जातो .
4 ) लसूण हा हृद्यविकारांना दूर ठेवण्यास मदत करतो
दररोज लसूण खाल्यामुळे मधुमेह , ब्लडप्रेशर , आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता कमी असते त्याचप्रमाणे लसूण हा रक्त पातळ करण्यास सुद्धा मदत करतो त्यामुळे हृदयाला सुरळीत रक्त पुरवठा होतो त्यामुळे हृदय हे निरोगी राहते
5) लसूणमुळे सर्दी खोकला बरा होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते
आपल्याला लहानपनी सर्दी खोकला झाला की आपली आजी आपल्याला वेगवेगळे काढे द्यायची आणि त्यामुळे आपला सर्दी खोकला बरा होऊन जायचा त्याचप्रमाणे लसूणचा अर्क सुद्धा सर्दी खोकल्यावर अतिशय गुणकारी मानला जातो आणि त्यामुळे फक्त सर्दी खोकलाचं बरा नाही होत तर आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते .
6) लसूण खाल्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो
अनेक संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की कच्चा लसूण खाल्यामुळे कॅन्सरचा धोका हा कमी होतो त्याचप्रमाणे
प्रोस्टेट कॅन्सर , लिव्हर कॅन्सर आणि फुफूसचा कॅन्सर चा धोका सुद्धा लसूण खाल्यामुळे कमी होतो .
त्याचप्रमाणे लसूण हा शरीरातील टॉक्सिसिटी ( Toxicity ) कमी करण्यास मदत करतो आणि त्यामुळे अनेक शारीरिक समस्यापसून आपलं संरक्षण होतं
7 ) लसूणमूळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते
शरीरातील रक्ताची कमतरता ही आपल्याला अनेक समस्या निर्माण करते म्हणून आपलं हिमोग्लोबिन हे नेहमी चांगल असलं पाहिजे आणि त्यावर लसूण हा फार गुणकारी मानला जातो . लसूण खाल्यामुळे रक्तवाढण्यास मदत होते कारण त्यामध्ये रक्तवाढीसाठी लागणारे अनेक महत्वाचे घटक असतात .
लसूण मध्ये अँटीमायक्रोबिल ( Antimicrobial ) गुणधर्म सुद्धा असतो ज्यामुळे आपल्या शरीरात असणारे घातक सूक्ष्मजीव मारण्याचे काम लसूण करतो .
लसूण खाण्याचे प्रमाण किती असावे ?
आपण दरोरोज जेवणात लसूण तर खातोच पण त्याव्यतिरिक्त सकाळी सकाळी लसूणच्या दोन कच्च्या पाकळ्या खाणे लाभदायी असते परंतु दरोरोज दोन पाकळ्यांच्या वरती जास्त लसूण खाणे आपल्या शरीराला त्रासदायक ठरू शकते .
लसूण खाल्यामुळे होणारे दुष्परिणाम कोणते ?
कोणत्याही औषधीचे जसे लाभदायी फायदे असतात तसे त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा असतात . कच्चा लसूण खाल्यामुळे मळमळ , तोंडाचा वास येणे , घशामध्ये जळजळ होणे , पोटात जळजळ होणे , जुलाब होणे , ऍसिडिटी होणे यासारखा त्रास होऊ शकतो
ज्यांना पोटाचे विकार आहेत , कमी रक्तदाब ( low blood pressure ) आहे त्यांनी लसूण हा कमी खावा किंवा शरीरावर कुठलीही शस्रक्रिया झाल्यावर काही दिवस जास्त प्रमाणात लसूण खाणे टाळावे किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्यानेच लसूण खावा .
महिलांनी गरोदरपणात किंवा स्तनपानात जेवणाव्यतिरिक्त कच्चा लसूण खावा किंवा नाही त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे
टीप- वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे आम्ही कुठलाही वैद्यकीय सल्ला देत नाही तसेच उपचार सुचवत नाही.
जाणून घ्या ब्राम्हीचे लाभदायी फायदे | benefits of ayurvedic Brambhi
One Comment