जाणून घ्या व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे | deficiency of Vitamin B12
व्हिटॅमिन बी12 | Vitamin B12
आपलं शरीर नेहमी निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स , मिनरल्स , फायबर आणि कार्बोहायड्रेटची ची अत्यंत गरज असते. आपल्याला अनेक पोषक तत्वे ही आपल्या रोजच्या अन्नातून मिळत असतात . त्यातला त्यात व्हिटॅमिन बी 12 हे एक असे व्हिटॅमिन आहे जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे.व्हिटॅमिन बी 12 ला कोबालामाईन( Cobalamine ) अस सुद्धा म्हणतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक लोकांना खूप समस्या उदभवतात .
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता ही साधारण वयाच्या साठी नंतर निर्माण होण्याची जास्त शक्यता असते . परंतु हल्लीच्या काळात ही समस्या कोणत्याही वयोगटात दिसून येत आहे
आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 चं कार्य काय असतं ?
आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या पुन्हा निर्मितीसाठी आणि आपली मज्जासंस्था ( Nervous System ) निरोगी ठेवण्यासाठी , व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचे असते .व्हिटॅमिन बी12 हे आपल्या मानसिक आरोग्यासाठीसुद्धा खूप उपयुक्त मानले जाते. व्हिटॅमिन बी12 हे आपल्याला अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण देते , व आपली रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढवते आणि आपला तणाव कमी करण्यास सुद्धा मदत करते .
शरीरामध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास खलील प्रमाणे लक्षण आढळून येतात.
● वारंवार थकवा येणे
● अशक्तपणा ,वाटणे
● सतत डोके दुखणे
● त्वचा पिवळसर होणे
● वारंवार तोंड येणं
● स्नायू कमकुवत होणे
● हृदयाची धडधड वाढणे
● श्वास घेण्यास त्रास होणे
● कामात चित्त न लागणे
● मानसिक थकवा जाणवणे
● भूक न लागणे
● पोटासंबंधी समस्या निर्माण होणे
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होण्याची कारणे ?
● योग्य आहार न घेणें
● शरीरात लाल रक्तपेशींची कमतरता असणे
● पोटासंमधी समस्या असणे
● शरीरावरील शस्रक्रिया
● ही काही कारणे आहेत ज्या मुळे शरीरातील व्हिटॅमिन बी 12 कमी होत असतं .परंतु व्हिटॅमिन बी 12 हे अनेक शारीरिक समस्यांमुळे सुद्धा कमी होण्याची शक्यता असते
व्हिटॅमिन बी12 हे कशातून मिळेल ?
व्हिटॅमिन बी 12 चा मुख्य स्रोत हा मटण , मासे, चिकन, अंडी यामध्ये आहे , तुम्ही जर मांसाहारी असाल तर चांगलीच गोष्ट आहे परंतु तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला vitamin b 12 हे दूध , दही , ताक , योगर्ट , टोमॅटो , सोयाबीन या मधून सुद्धा मिळेल , आणि बाजारात काही अशी औषधे सुद्धा उपलब्ध असतात जी तुमची व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढतील.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची समस्या ही आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते त्याकरता व्हिटामिन बी 12 च्या कमतरतेची कुठलीही लक्षणे आढळून आल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा .
टीप-वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे , तुम्हाला काही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .
2 Comments