रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स | Tips for Immunity

आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्तीचं फार मोठं कार्य आहे , आणि ती जन्मतः प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये असतेच परंतु ती रोगप्रतिकारक शक्ती काही कारणामुळे कमी जास्त होत असते .
रोगप्रतिकारक शक्ती आपलं अनेक प्रकारच्या बॅक्टेरिया , व्हायरस , फंगस आणि टॉक्सिन्स यापासून संरक्षण करत असते . परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपलं खाण्यापिण्याकडे फार दुर्लक्ष होतंय , त्याचं प्रमाणे चिंता , तणाव आणि व्यसनं यामुळे सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका उद्भवत आहे . ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते त्यांचं अनेक छोट्या मोठ्या आजारांपासून संरक्षण होत असतं . परंतु ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते , ते वारंवार आजारी पडत असतात त्यांना नेहमी सर्दी , खोकला , ऍलर्जी यांसारख्या समस्या उद्भवत असतात . त्याचप्रमाणे आजकालच्या बदलत्या वातावरणामध्ये अनेक प्रकारचे घातक विषाणू असतात आणि ते विषाणू आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर नेहमी हल्ला करत असतात .

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या औषधी उपलब्ध आहेत , परंतु त्या काही प्रमाणातच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात परंतु आपण आपल्या दररोजच्या जीवनात जर काही गोष्टींचं पालन केलं आणि आपल्या जीवनशैलीत काही बदल केला तर आपण आपली रोगप्रतिकार शक्ती बऱ्यापैकी वाढवू शकतो . म्हणून आपण आपल्या ह्या लेखामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स बघणार आहोत .

1 ) पौष्टिक आहार घेणे :

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आहार हा शरीरासाठी किती महत्वाचा असतो. परंतु आपण घेत असलेला आहार हा पौष्टिकचं असला पाहिजे . कारण शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण फार गरजेचं आहे , आणि त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा चांगली टिकवून ठेवण्यासाठी पौष्टिक आहार फार महत्वाचा असतो . त्यासाठी दररोज आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे . त्याचबरोर सगळ्या प्रकारचे धान्य आपल्या आहारात असले पाहिजेत , अधून मधून आपल्या जेवणामध्ये फळे किंवा सलाड असेल तर अधिक चांगल.

● व्हिटॅमिन सी ( Vitamin C ) असलेली फळे खावीत :

आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी फार महत्वाचे आहे ते आपल्या शरीराचं अनेक प्रकारच्या इन्फेकशन्स ( Infections ) पासून बचाव करतं . आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवण्यास मदत करते . व्हिटॅमिन सी साठी आपण , संत्री , मोसंबी , आवळा , निंबू , पेरू , किवी , टोमॅटो , स्ट्राबेरी , किवी इ फळे खावीत .

● आयुर्वेदिक काढा घ्या :

लहापनी आपल्याला सर्दी खोकला झाला की घरातील मोठी माणसं आपल्याला तुळशी , अद्रक , दालचिनी , लवंग , मिरे , हळद असलेला गरमागरम आयुर्वेदिक काढा द्यायचे . आणि त्यामुळे आपल्याला बऱ्या प्रमाणात सर्दी खोकल्याला फरक पडायचा . त्याचं कारण म्हणजे आपली कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती त्या आयुर्वेदिक काढ्यामुळे काही प्रमाणात वाढायची . आणि आपल्याला बरं वाटायचं . कोरोना सारख्या गंभीर महामारीत सुद्धा आयुर्वेदिक काढ्याने अनेकांचे प्राण वाचवले , त्यामुळे आपणही आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने अधून मधून आयुर्वेदिक काढ्याचं सेवन केलं पाहिजे . जेणेकरून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढेल .

2 ) व्यायाम :

शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम फार महत्वाचा आहे . त्याचप्रमाणे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा व्यायाम गरजेचा आहे . रोज सकाळी लवकर उठून व्यायाम केल्याने शरीराला शुद्ध ऑक्सिजन मिळतो . त्याचबरोबर शरीराला एक नवीन ऊर्जा मिळत असते .व्यायामामुळे संपूर्ण शरीराला बाहेरील घातक विषाणूंपासून संरक्षण मिळत असते .व्यायामामुळे हृदय निरोगी आणि तंदुरुस्त राहते . त्यामुळे संपूर्ण शरीराला सुरळीतपणे रक्तपूरवठा होऊन शरीर निरोगी राहते .

● योगा आणि मेडिटेशन :

हल्लीच्या काळात आपण बघतोय की माणूस हा योगा आणि मेडिटेशन कडे फार वळलाय . आणि त्याचं कारण ही तसंच आहे . योगा आणि मेडिटेशन मुळे शरीर हे फार निरोगी होतं आणि त्याचप्रमाणे अनेक छोटे मोठे आजार देखील योगा आणि मेडिटेशन मुळे आटोक्यात येतात . उच्चरक्तदाब , मधुमेह , आणि थायरॉईड या सारखे आजार सुद्धा योगा आणि मेडिटेशनमूळे नियंत्रणात राहायला मदत होतेय . अनेक संशोधनांमध्ये हे सुद्धा सिद्ध झालंय की योगा आणि मेडिटेशनमूळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढण्यास फार मदत होतेय म्हणून रोज सकाळी व्यायामाबरोबरच योगा आणि मेडिटेशन करणं फायदेशीर आहे .

● सकाळच्या कोवळ्या ऊन्हात बसा .

सगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी तर अत्यंत महत्वाचे आहे . कारण व्हिटॅमिन डी मुळे उच्चरक्तदाब नियंत्रणात राहते .त्याचबरोबर हाडे मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरॅसिस ( Osteoporosis ) सारख्या गंभीर आजारापासून संरक्षण होते . आणि व्हिटॅमिन डी हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास सुद्धा मदत करते . त्यामुळे आपण सकाळी वीस मिनिट कोवळ्या उन्हात बसलं किंवा फिरलं पाहिजे कारण व्हिटॅमिन डी चा मुख्य स्रोत हे कोवळं ऊन आहे .

3) तणावापासून दूर रहा :

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या व्यापामुळे अनेक जण तणावग्रस्त असतात . आणि तणावाचा थेट परिणाम हा संपूर्ण शरीरावर होत असतो . आणि त्यामुळे अनेक शारिरीक आणि मानसिक समस्या उद्भवतात. सततच्या चिंतेमुळें आणि तणावामुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो .त्याकरिता तणावाचं मॅनेजमेंट करणं हे अत्यंत गरजेचं आहे . तणाव कमी करण्यासाठी योगा आणि मेडिटेशन फार फायदेशीर ठरते .

● पुरेशी झोप घ्या :

आपल्याला माहीतचं आहे की सततच्या कामामुळे आपल्याला दररोज मानसिक आणि शारीरिक थकवा हा येत असतो , आणि त्यामुळे पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे . दररोज कमीत कमी सात ते आठ तास झोप ही झालीचं पाहिजे .पुरेश्या झोपेमुळे तानावसुद्धा कमी होण्यास मदत होते .

● व्यसनापासून दूर रहा :

दारू सिगारेटचं किंवा कुठलंही व्यसन हे शरीरासाठी खूप हानिकारक आहे . ते शरीराला आतून पोकळ करत असतं . व्यसन हे संपूर्ण शरीराला हानी तर पोहचवतचं परंतु व्यसन हे हृदय , लिव्हर , फुफ्फुस आणि किडनीला फार मोठ्या प्रमाणात हानी पोहचवत असतं आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी होते .त्यामुळे टोबॅको , स्मोकिंग , आणि ड्रिंकिंग पासून जास्तीत जास्त दूर राहील पाहिजे .

महत्वपूर्ण सूचना : वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे . आम्ही कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देत नाही .तुम्हाला आरोग्या विषयी काही अडचण असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .

Important Notice: The above article is for general information only. We do not give any kind of medical advice.If you have any health problem, please consult your doctor.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *