हळद खाण्याचे 7 लाभदायी फायदे | benefits of Turmeric
हळद : खाण्याचे 7 लाभदायी फायदे | Turmeric
हळद ही अनेक वर्षांपासून दररोज आपल्या आहारामध्ये वापरली जातेय परंतु त्यामध्ये किती औषधीय गुण आहेत हे आपल्याला माहीत आहे का ? हजारो वर्षांपासून वैद्य हळद ही अनेक आजारांवर उपचार वापरत आहेत आणि त्याचे अनेक लाभदायी फायदे सुद्धा दिसून येत आहेत .
हळद ही जिंजर परिवारातून ( Ginger Family ) येते तिला कुरकुमीन ( Curcumin ) असं सुद्धा म्हणतात . हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट ( Antioxidant ) आणि अँटिइन्फालमेंटरी ( Antiinflamentory ) गुणधर्म असतो जो अनेक शारीरिक समस्यांमध्ये गुणकारी ठरतो .
1 ) शरीरातील सूज कमी करण्यास उपयुक्त
काही आजारांमुळे शरीरातील अवयांमध्ये आलेली सूज हळदीच्या सेवनामुळे कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला शरीरातील डॅमेज झालेले टिशू सुद्धा हळदीमुळे सुधारतात .
हळदीच्या सेवन हे जॉइन्ट् पेन , सूज , किंवा संधीवातामध्ये सुद्धा उपयुक्त ठरते .
2 ) हृदय विकारांचा धोका कमी करते
आज संपूर्ण जगामध्ये जास्त मृत्यू होत असेल तर हृदय विकारांमुळे होतो , हृदय विकाराची समस्या ही फार गंभीर समस्या आहे आणि त्यामुळे शरीरातील इतर अवयांना सुद्धा धोका निर्माण होतो .परंतु हळदीच्या दररोज सेवनामुळे हृदय विकारांचा धोका हा बऱ्यापैकी कमी होतो .
3) हळद कँसर होण्यापासून संरक्षण करते
कँसर हा फार गंभीर आजार आहे त्यामुळे जीवन मृत्युचा प्रश्न निर्माण होऊन जातो परंतु आजच्या युगात कॅन्सरवर अनेक असे प्रभावशाली उपचार आहेत ज्यामुळे कॅन्सर रुग्णांचा जीव वाचतो परंतु हळदीच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याचा धोका फार कमी होऊन जातो . हळद ही अनियंत्रित पेशींची वाढ रोखण्यास मदत करते .
4) हळद ही चेहऱ्यावरील पुरळ कमी करण्यास लाभदायी आहे
हळदीच्या सेवनामुळे आणि चेहऱ्यावर हळदीचा लेप लावल्याने चेहऱ्यावरील पुरळ आणि काळे डाग बऱ्यापैकी कमी होतात त्याच प्रमाणे चेहरा सुद्धा उजळतो . त्याचप्रमाणे हळद ही तर छोट्या जखमांसाठी वरदान आहे . एखादी छोटी जखम झाल्यास त्याठिकाणी कोरडी हळद लावल्यास तेथील रक्तप्रवाह ही थांबतो आणि जखम लवकर कोरडीही होते .
5) सर्दी खोकल्यास अतिशय गुणकारी
आपण लहानपणा पासून बघत आलो आहे की आपल्याला सर्दी खोकला झाला की आपली आजी किंवा आई आपल्याला सांगायची की दूध हळद घे , आणि त्यामुळे आपला सर्दी खोकला ही पटकन बरा होऊन जायचं , हळद ही सर्दी खोकल्यावर खूप गुणकारी आहे सर्दी खोकला झाल्यास एक ग्लास दुधामध्ये एक चमचा हळद घेणे किंवा कोमट पाण्यासोबत सुद्धा हळद घेतल्यास चालेल .
6) माऊथ अल्सर आणि पोटाच्या समस्यांमध्ये उपयुक्त
हळद ही तोंड आल्यास फार गुणकारी आहे ज्या ठिकाणी तोंड आलं आहे त्याठिकाणी कोरडी हळद लावणे किंवा एक ग्लास कोमट पाण्यात अर्धी चमचा हळद टाकून त्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात , त्याच प्रमाणे हळद ही पोटाचे गॅसेस , जळजळ , पोट जड होणे यावर सुद्धा गुणकारी आहे
7) हळद ही बुद्धिवर्धक आणि जंतूंनाशक म्हणून सुद्धा उपयुक्त
हळदीच्या सेवनामुळे बुद्धी वाढण्यास सुद्धा मदत होते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात जाणारे घातक सूक्ष्मजीव मारण्याचं काम सुद्धा हळद करते . लिव्हरमध्ये असणारी घाण सुद्धा हळद साफ करते .
हळदीचे सेवन कसे करावे ?
आपल्या जेवणामध्ये दरोरोज हळद तर असतेच परंतु त्याव्यतिरिक्त आपण हळदीची पावडर दुधासोबत , कोमट पाण्यासोबत घेऊ शकतो , आणि हल्ली तर हळदीचं लोणचं , हळदीची चहा , हळदीच्या गोळ्या सुद्धा उपलब्ध असतात .
परंतू हळद घेण्याअगोदर एकवेळेस आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या .
हळदीचे दुष्परिणाम कोणते ?
दरोरोज अति प्रमाणात हळदीचे सेवन केल्यास , मळमळ , उलटी , जुलाब , पोटात जळजळ होणे या सारख्या त्रास होऊ शकतो .
टीप- वरील लेख हा फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा .
One Comment