झोप न येण्याची कारणे आणि उपाय | Sleep Problem

झोप न येण्याची समस्या ही आपल्यासाठी काही नवीन नाही , असंख्य अशी लोकं आहेत ज्यांना रात्रीची झोप येत नाही आणि त्याची मुख्य कारणे म्हणजे बदललेली जीवनशैली , तणावग्रस्त जीवन , कामाची दगदग , नैराश्य ,अयोग्य खानपान , व्यसन , टिव्ही , मोबाईल इ. आणि अनेक असे गंभीर आजार.

माणसाला दररोज सात ते आठ तास झोपेची गरज असते परंतु रात्रीची झोप ही पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं जसे की थकवा , कामात मन न लागणे , चिडचिडपणा होणे , आळस येण इ .त्यासाठी दररोज पुरेशी झोप घेणं ही गरजेची असते.

झोप न येण्याची लक्षणे कोणती ?

रात्री झोप न येण्याची खालीलपैकी काही लक्षणे आपल्याला आढळून येऊ शकतात . ही लक्षणे जर का वारंवार दिसून येत असतील तर यावरून आपल्याला झोप न येण्याचा त्रास लक्षात येऊ शकतो.

● डोकेदुखी
● रात्री उशिरापर्यंत झोप न लागणे
● वारंवार झोप मुडणे
● वारंवार झोपेतून उठून चकरा मारणे
● सकाळी अति लवकर जाग येणे
● डोक्यात विचार चक्र चालू असणे
● चित्त एकाग्र न होणे

झोप न येण्याची कारणे :

झोप न येण्याची अनेक प्रकारची कारणे आहेत त्यापैकी खाली आपण काही महत्वाचे कारणे जाणून घेऊयात.

  • बदललेली जीवनशैली (Changing Lifestyle ) : आपली बदललेली जीवनशैली ही झोप न येण्याला कारणीभूत ठरू शकते . रात्री उशिरा झोपणे , सकाळी अति उशिरा उठणे , व्यसन , अयोग्य खानपान , व्यायामाचा अभाव , शारिरीक अस्वछता ह्या काही सवयी झोप न येण्याला कारणीभूत ठरू शकतात.
  • चिंता आणि तणाव ( Stress ) : चिंता करणे ही काही वाईट गोष्ट नाही ती प्रत्येकालाच असतेचं परंतु अति चिंता करणे हे आपल्या शरीरासाठी खूप त्रासदायक असते.त्याचप्रमाणे तणाव हा सुद्धा आपल्यासाठी काही चांगला नाही त्यामुळे आपल्याला अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागत त्यामुळे तणाव आणि चिंतेमुळे आपल्याला झोप न येण्याचा त्रास उद्भवू शकतो.
  • डिप्रेशन ( Depression ) : डिप्रेशन मध्ये असणे ही बाब फार घातक असते त्यामुळे डोक्यात फार वेगवेगळे विचार येत असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनावर सुद्धा वाईट परिणाम होतो.डिप्रेशनमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात आणि त्यापैकी झोप न येण्याची समस्या सुद्धा उदभवत असते.
  • अँक्सिएटी ( Anxiety ) : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना अँक्सिएटीचा त्रास होऊ लागलाय . त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय.अँक्सिएटीमूळे शारिरीक आणि मानसिक त्रास तर होतोच परंतु अँक्सिएटी ही झोप न येण्याला सुद्धा कारणीभूत ठरत असते.
  • व्यसने ( Addictions ) : वेगवेगळ्या प्रकारची वाईट व्यसने ही शरीरासाठी फार घातक असतात त्यामुळे संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होतो.वाईट व्यसनांमूळे अनेक प्रकारचे गंभीर आजार होतात . त्याचप्रमाणे व्यसनांमूळे झोप न येण्याचा त्रास सुद्धा उद्भवतो.
  • टीव्ही आणि मोबाईल ( TV and Mobail ) : रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि टीव्ही बघितल्यामुळे डोळ्यांवर तर परिणाम होतोच परंतु रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर केल्याने झोपेचा पॅटर्न बिघडतो आणि त्यामुळे कालांतराने झोप न येण्याची समस्या उद्भवते.
  • अयोग्य आहार ( Unhealthy food ) : तेलकट , तिखट , खारट ,मसालेदार किंवा मैद्याचे पदार्थ अति प्रमाणात खाल्याने पोटाची समस्या उद्भवते आणि त्यामुळे ऍसिडिटी , छातीत जळजळ होणे या सारखा त्रास होऊ लागतो आणि त्यात असे पदार्थ रात्री खाल्यास ऍसिडिटी , छातीत जळजळ होते आणि त्यामुळे सुद्धा झोप येत नाही.
  • गंभीर आजार ( Serious Illness ) : अनेक प्रकारच्या गंभीर आजारांमध्ये झोप न येण्याची समस्या ही असतेचं , त्यात झोपेचे आजार , मानसिक आजार ,श्वसनासबंधी आजार आणि अनेक गंभीर आजाराचं समावेश असतो.
  • ( वरील काही कारणे ही झोप न येण्याला कारणीभूत ठरू शकतात परंतु एकवेळेस डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा )

पूर्ण झोप न झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम कोणते ?

रात्री पूर्ण झोप न झाल्यामुळे दुसऱ्यादिवशी अनेकप्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात जसे की…..

● कामात चित्त न लागणे
● चिडचिडपणा होणे
● आळसपणा येणे
● डोकेदुखी , डोके जड पडणे
● अशक्तपणा , थकवा वाटणे
● दिवसभर झोपेची डुलकी येणे||

रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी काय करावे ?

● मानसिक ताण घेऊ नये
● रात्री मोबाईलचा वापर कमी करावा
● रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघू नका
● रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका
● रात्री हलकं अन्न घ्यावे
● झोपण्यापूर्वी कुठलेही व्यसन करू नये
● रात्री झोपतांना चहा , कॉफी घेऊ नये
● सकाळी व्यायाम आणि मेडिटेशन करावे
● रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ फिक्स करा

हे सुद्धा वाचा : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी टिप्स

टीप-वरील लेख हा सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला झोपेसबंधी कुठलीही तक्रार असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

Similar Posts