थकवा येण्याची कारणे आणि घरगुती उपाय | Fatigue
थकवा –
आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला थकवा हा जाणवतोच आणि त्याच मुख्य कारण म्हणजे दिवसभर असणारी कामाची दगदग आणि अति श्रम त्याचबरोबर थकवा येण्याची काही सामान्य कारणे सुद्धा आहेत जसे की मानसिक तणाव , अशक्तपणा ,अयोग्य आहार , अपूर्ण झोप , व्यसन आणि प्रवास इ.
थकवा हा काही सामान्य कारणांमुळे जरी येत असला तरी काही काही जणांमध्ये थकवा हा काही गंभीर आजारांमुळे सुद्धा येतो जसे की हृद्यविकार , मधुमेह , संधिवात , कँसर , किडनी विकार इ .सामान्य थकव्यासाठी कुठलीही औषधी घेण्याची गरज पडत नाही काही वेळ विश्रांती केल्याने किंवा काही घरगुती उपाय केल्याने सुद्धा थकवा दूर होतो परंतु काही जणांना थकव्यासाठी डॉक्टरांच्या उपचाराची गरज पडते.
थकवा का होतो ? त्याची कारणे काय ? आणि त्यावर घरगुती उपाय काय हे सगळं आपण आपल्या ह्या पोस्टमध्ये सविस्तर बघणार आहोत.
थकव्याचे प्रकार
● मानसिक थकवा
● शारीरिक थकवा
थकवा येण्याची कारणे
● मानसिक थकवा येण्याची कारणे – खाली दिलेल्या काही कारणांमुळे मानसिक थकवा हा येत असतो
● तणाव
● अँक्सिएटी
● नैराश्य
● बिघडलेली नाती
● जीवनातील आर्थिक समस्या
● काही मानसिक आजार
● शारीरिक थकवा येण्याची कारणे – शारीरिक थकवा हा खाली दिलेल्या काही कारणांमुळे येतो.
● अपूर्ण झोप
● अयोग्य आहार ,व्यसन
● सर्दी , फ्लू
● मधुमेह , थायरॉईड
● संधिवात , झोपेचे विकार
● हृदय विकार , फुफूसाचे विकार
● किडनी विकार , लिव्हरचे विकार
● क्रोनिक फटीग सिन्ड्रोम
● इलेक्ट्रोलाईट इनबॅलेन्स
● कॅन्सर किंवा किमोथेरपी
● शरीरातील रक्ताची कमी
● शरीरातील व्हिटॅमिन्स ची कमतरता
● शरीरातील प्रोटिन्सची कमतरता
● किंवा शरीसाठी लागणारे पोषकतत्वांची कमतरता
● काही औषधांमुळे सुद्धा थकवा येऊ शकतो
हे सुद्धा वाचा : रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स
थकव्याची लक्षणे
थकव्याची अशी विषेश कोणतीच लक्षणे नाहीत कारण थकवा हेच एक प्रकारचे लक्षण आहे परंतु थकव्या बरोबरच खालील काही लक्षणे आढळून येऊ शकतात.
● डोकेदुखी , अंगदुखी
● चक्कर येणे ,अंधुक दिसणे
● भूक मंदावणे , अशक्तपणा वाटणे
● एकाग्रता कमी होणे , चिडचिड होणे
● हालचाल करण्याची क्षमता कमी होणे
थकवा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
घरगुती उपाय हे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांवर उपयोगी ठरत असतात त्याच प्रमाणे असे सुद्धा काही घरगुती उपाय आहेत जे थकवा कमी करण्यास आपली मदत करतील.
आहारात बदल करा : बऱ्याचवेळा थकवा येण्याचं कारण हे शरीरात असणाऱ्या व्हिटॅमिन्स , प्रोटिन आणि मिनरल्स च्या कमतरतेमुळे असतं त्याकरता आपल्या आहारामध्ये सगळ्या प्रकारचे धान्य , हिरवा भाजीपाला , सुकामेवा आणि व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश असावा जेणेकरून आपल्या शरीराला पूर्ण पोषण मिळेल.
भरपूर पाणी प्या : अनेक जणांना थकवा हा शरीरात असणाऱ्या पाण्याच्या कमतरतेमुळे येतो खास करून उन्हाळ्यात त्याकरता दररोज पाणी भरपूर पिले गेले पाहिजे.
लिंबू सरबत घ्या : लिंबू सरबत हे थकव्यासाठी खूप गुणकारी मानलं जातं कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आणि त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते त्याकरता थकवा जाणवल्यास एक ग्लास लिंबू सरबत घ्यावे परंतु ज्यांना सर्दी , खोकल्या चा आहे त्यांनी लिंबू सरबत घेणे टाळावे.
मल्टिव्हिटॅमिन्स टॉनिक घ्या : बाजारामध्ये अनेक नामांकित कंपन्यांचे मल्टिव्हिटॅमिन्स टॉनिक आहेत ज्यामध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात व थकवा कमी करण्यास सुद्धा उपयुक्त ठरतात परंतु कुठलेही मल्टिव्हिटॅमिन्स टॉनिक घेतांना ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
थकवा येऊ नये यासाठी उपाय
● दररोज व्यायाम करा
● पोषक आहार घ्यावा
● भरपूर पाणी प्यावे
● रात्रीचे जागरण टाळावे
● मानसिक तणाव कमी करावा
● मधुमेह नियंत्रणात ठेवावा
● धूम्रपान , मद्यपान टाळावे
● स्वतःच्या मनाने औषधी घेऊ नयेत
वारंवार थकवा येत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये
तुम्हाला वारंवार किंवा सतत थकवा जर येत असेल तर प्रत्येक वेळेस तो सामान्य थकवा असेलचं असं नाही , ते एखाद्या आजाराचं लक्षण सुद्धा असू शकत त्याकरता तुम्हाला जर नेहमी नेहमी अति थकवा येत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
टीप- वरील माहिती ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे तुम्हाला कुठलीही शारीरिक समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
हे सुद्धा वाचा : ऍसिडिटी चे कारणे , लक्षणे आणि त्यावर घरगुती उपाय